Ridiculous! बॉलिवूड हा शब्दही हॉलिवूड या शब्दावरुन चोरला आहे.. ही बाब किती विचित्र आहे असं कंगना अभिनेत्री कंगना रणौतने तिच्या नव्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. या सिनेसृष्टीत अनेक 'भांड' म्हणजे वेळेला कुणाचीही नक्कल करुन आपला चरितार्थ चालवणारे लोक आहेत जे स्वतःला कलाकार म्हणवतात. एवढंच नाही तर आपल्याकडे भारतीय चित्रपटसृष्टीही आहे आणि आपल्याकडे बॉलिवूडही आहे. बॉलिवूड हा हॉलिवूड या शब्दावरुन चोरलेला शब्द आहे. अशा बॉलिवूडला खुलेपणाने नकार द्या असं आवाहन कंगनाने तिच्या नव्या ट्विटमध्ये केला आहे. There are ARTISTS and there are BHANDS there is INDIAN FILM INDUSTRY and there is BOLLYWOOD #IndiaRejectBollywood most ridiculous word BOLLYWOOD itself copied and stolen from HOLLYWOOD. Please reject this derogatory word #IndiaRejectBollywood — Kangana Ranaut (@KanganaTeam) October 15, 2020 अभिनेत्री कंगना रणौत गेल्या काही दिवसांपासून तिच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत आहे. अशात तिचं आणखी एक वक्तव्य समोर आलं आहे. ज्यामध्ये तिने बॉलिवूड या शब्दावर तर टीका केलीच आहे शिवाय इथल्या कलाकारांना भांड असंही संबोधलं आहे. कालही केली होती टीका “बॉलिवूडमधील सर्व लांडगे एकत्र येऊन वृत्तमाध्यमांवर हल्ला करण्याची तयारी करत आहेत. ज्यावेळी मजुरांवर, शेतकऱ्यांवर, स्त्रियांवर, गरीब जनतेवर अन्याय होतो त्यावेळी ही मंडळी कुठे असतात? हे लोक आज मानवाधिकाराच्या गप्पा मारत आहेत पण इतरांच्या हक्कांवर गदा येते तेव्हा गप्प बसतात.” अशा आशयाचं ट्विट करुन कंगनाने आपला संताप व्यक्त केला होता. यापूर्वी अशाच प्रकारची टीका दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री याने देखील केली होती.