युट्युबर प्राजक्ता कोळी सध्या तरुणाईची प्रचंड आवडती आहे. मोस्टली सेन या नावाने ती व्हिडिओ बनवते आणि सोशल मीडियावर शेअरही करत असते. आपल्या व्हिडिओतून ती सतत लोकांचं मनोरंजन करत असते. आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुनही ती तिच्या चाहत्यांच्या संपर्कात असते. तिला नुकतीच करोनाची लागण झाल्याचं आता समोर आलं आहे.

प्राजक्ताने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन याबद्दल पोस्ट करत माहिती दिली आहे. या पोस्टमध्ये ती म्हणते, “सर्व प्रकारची काळजी घेऊनही मला करोनाची लागण झाली आहे. माझी करोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. मी व्यवस्थित आहे. माझे डॉक्टर आणि माझा परिवार माझी योग्य प्रकारे काळजी घेत आहेत. तुमच्या प्रेमाबद्दल आणि काळजीबद्दल आभार. सुरक्षित रहा, मास्क वापरा.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Prajakta Koli (@mostlysane)

प्राजक्ताच्या या पोस्टवर तिचे चाहते आणि मित्रपरिवाराने कमेंट्स करत तिची विचारपूस केली आहे.अभिनेते गजराज राव, अभिनेत्री श्वेता त्रिपाठी, गायक टोनी कक्कर, अरमान मलिक, मल्लिका दुआ, युट्युबर आशिष चंचलानी यांनीही तिच्या पोस्टवर कमेंट करत तिला काळजी घेण्यास सांगितले आहे.

प्राजक्ता ‘मोस्टली सेन’ या नावाने प्रसिद्ध आहे. तिने ‘खयाली पुलाव’, ‘मिसमॅच्ड’ अशा चित्रपटांमध्ये कामही केलं आहे. त्याचबरोबर तिने मुलींच्या शिक्षणाचं महत्त्व पटवून देण्यासाठी #GirlsCount या चळवळीत सहभागही घेतला होता. संयुक्त राष्ट्रांच्या गोलकिपर्स प्रोग्रॅममध्ये ती सहभागी झाली होती.

Story img Loader