१० मे हा मदर्स डे म्हणून ओळखला जातो. त्यामुळे आज संपूर्ण जगभरामध्ये मदर्स डे उत्साहात साजरा केला जात आहे.आईप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा दिवस खास साजरा केला जातो. खरं तर आईची महती, तिचं प्रेम शब्दांमध्ये व्यक्त करता येणं शक्य नाही. मात्र तरीदेखील प्रत्येक जण त्यांना शक्य होईल त्या पद्धतीने आईप्रतीचं प्रेम, आदर व्यक्त करण्याचा प्रयत्न करत असतात. यामध्येच मराठमोळी अभिनेत्री शिवानी बावकरनेदेखील तिच्या आईप्रतीच्या भावना व्यक्त केल्या आहे.
दरम्यान, ‘लागीरं झालं जी’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेल्या शिवानीने खास शब्दांमध्ये तिच्या आईप्रतीचं प्रेम व्यक्त केलं आहे. या व्हिडीओमधून शिवानीने तिची आई नेमकी तिच्यासाठी कशी आहे, ती दिवसभर शिवानीसाठी काय काय करते हे सांगितलं आहे. विशेष म्हणजे तिची आई शिवानीची चांगली मैत्रीण, सल्लागारदेखील असल्याचं शिवानीने आवर्जुन सांगितलं आहे.