वयाची चाळीशी ओलांडली तरी अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा फिटनेस तरुण अभिनेत्रींना लाजवेल असाच आहे. आपला प्रत्येक लूक परफेक्ट दिसावा म्हणून शिल्पा स्वतः मेहनत घेते. सोशल मीडियावर देखील ती फार सक्रिय असते. फिटनेस, डाएटबाबत अनेक गोष्टी ती सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या चाहत्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते. आता देखील तिने एक खास व्हिडीओ तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

शिल्पाने समिशा आणि वियान या तिच्या दोन मुलांबरोबर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये समिशा आणि वियान आपल्या आईचा मेकअप करताना दिसत आहेत. त्यांचा हा क्युट व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. वियान-समिशा शिल्पाच्या चेहऱ्यावर मेकअप ब्रशने मेकअप करताना दिसत आहेत. तर शिल्पा आपल्या मुलांकडून अगदी आनंदाने मेकअप करून घेत आहे.

शिल्पाने मातृदिनानिमित्त हा व्हिडीओ शेअर केला आहे. आजचे माझे नवीन मेकअप आर्टिस्ट असं शिल्पा या व्हिडीओमध्ये बोलताना दिसत आहे. तिने या व्हिडीओला ‘हॅप्पी बेबी आणि हॅप्पी मम्मी’ असं कॅप्शन दिलं आहे. शिल्पा एक उत्तम अभिनेत्री तर आहेच. पण त्याचबरोबरीने ती एक आदर्श आईसुद्धा आहे.

आणखी वाचा – Mother’s Day 2022 : ‘या’ मराठी सुप्रसिद्ध कलाकारांच्या आई आहेत उत्तम अभिनेत्री, पाहा फोटो

आपलं काम सांभाळत कुटुंबाला अधिकाधिक वेळ देताना शिल्पा नेहमी दिसते. मुलांबरोबर विविध खेळ खेळणं, त्यांच्याबरोबर फिरायला जाणं तिला फार आवडतं. आज मातृदिनानिमित्त देखील शिल्पा आपल्या मुलांसोबत बाहेर फिरायला गेली असल्याचे बरेच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यावरुनच ती एक आदर्श आई असल्याचं दिसून येतं.