चित्रपटात किसींग सिन असणे ही बाब आता फार सामान्य झाली आहे. पण, विशेष म्हणजे बॉलीवूडमध्ये अधिक किस करण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या इमरान हाश्मीचा रेकॉर्ड ‘काय पो छे’ अभिनेता सुशांत सिंग राजपूतने मोडला आहे. सुशांत आता बॉलीवूडचा नवा सिरीयल किसर बनला आहे. त्याने आगामी ‘शुद्ध देसी रोमान्स’ चित्रपटात तब्बल २७ किस केले आहेत.
सुशांत ‘शुद्ध देसी रोमान्स’मध्ये परिणिती चोप्रा आणि वाणी कपूरसोबत प्रणयदृश्य करताना दिसणार आहे. त्याने एका पर्यटक मार्गदर्शकाची भूमिका साकारली असून यात परिणिती अतिशय बोल्ड भूमिकेत दिसेल. चित्रपटातील किसींग सिन्सनी बॉलीवूडमध्ये नेहमीच खळबळ निर्माण केली आहे. मग, यात ‘राजा हिंदुस्तानी’मधला आमिर-करिष्माचा किस असो किंवा ‘धूम २’ मधला ऐश्वर्या-हृतिकचा किस असो. आता या चित्रपटातील २७ किसची जादू चित्रपटाला चांगले यश प्राप्त करून देते का ते चित्रपट ६ सप्टेंबरला प्रदर्शित झाल्यावरच कळू शकेल.

Story img Loader