गेल्या महिन्यामध्ये ‘पद्मावती’ चित्रपट प्रदर्शनावरून देशभर सिनेमाबाह्य़ वर्तुळात जी राळ उठली, त्यात इतर अनेक छोटे-मोठे सिनेवाद झाकोळले गेले. त्यातला एक वाद होता तो ‘बासमती ब्लूज’ या चित्रपटाच्या समाजमाध्यमांत पसरलेल्या अल्पांशावरून (ट्रेलर). भारतीयांच्या बालिशपणाचे किंवा बालिश भारतीयांच्या चित्रीकरणाचे उत्तम उदाहरण असल्याचे नमूद करून ट्विटरखोरांनी चित्रपटावर आणि त्यातल्या प्रमुख अभिनेत्री असलेल्या ब्री लार्सनवर लेखनसुख घेतले. चित्रपटाची गंमत अशी की तो २०१२ साली चित्रित झाला तेव्हा ब्री लार्सन हिची ओळख बालकलाकारापलीकडे नव्हती. टोनी कोलेट हिच्या गाजलेल्या ‘युनायटेड स्टेट्स ऑफ टॅरा’ या टीव्ही मालिकेत मुलीची भूमिका वठविणारी ही अभिनेत्री जोसेफ गॉर्डन लेव्हिटच्या ‘डॉन जॉन’ चित्रपटात सेक्स अॅडिक्ट भावाच्या जगभरातील कारनाम्यांमध्ये मुकी नसूनही कुटुंबात पूर्ण चित्रपटभर गमतीशीर संवादशून्य काम करून टाळ्या मिळवून गेली. त्यानंतर तिच्या अभिनयाचा आलेख ‘द रूम’ चित्रपटासाठीच्या ऑस्कर पारितोषिकाने स्पष्ट केला. मात्र यशशिखरावर नसतानाच्या काळात तयार झालेला बासमती ब्लूज चित्रगृहात प्रदर्शित होण्यासाठी पाच वर्षांचा कालावधी जावा लागला. चित्रपटाच्या मुखपृष्ठापासून ट्रेलपर्यंत लार्सनच्या ऑस्कर विजयाच्या मुद्दय़ाला अधोरेखित करण्यात आले असले, तरी ट्रेलरमधल्या गमतींनी किंवा गेल्या महिन्यातील एकूणच सिनेविरोधाच्या वातावरणामध्ये ‘भारताची प्रतिमा’ वगैरे या नेहमीच्या मुद्दय़ावर समाजमाध्यमात गदारोळ उडाला.
गंमतशीर भातकारण!
भारतीय नव्या शेतकरी पिढीच्या नृत्यलालसेचा ‘अचूक’ धांडोळा या चित्रपटात बहुधा घेण्यात आला आहे.
Written by पंकज भोसले
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 10-12-2017 at 00:23 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Movie basmati blues reviews