रोड मूव्ही हा आपला आवडता चित्रपट प्रकार दिग्दर्शकाने पुन्हा एकदा वेगळ्या दृष्टिकोनातून, निराळ्या बाजासह मांडण्याचा स्तुत्य प्रयत्न ‘हायवे’ या चित्रपटाद्वारे केला आहे. तरीही कथानकातील काही कच्चे दुवे राहिल्यामुळे हा रस्त्यावरचा दोन मुख्य व्यक्तिरेखांचा प्रवास पूर्णपणे आनंद देऊ शकत नाही. काही प्रमाणात एक वेगळी कलावंत जोडी पडद्यावर पाहायला मिळणे हा नावीन्याचा भाग असला तरी अप्रतिम छायालेखनाची जोड मिळूनही पटकथेतील न पटणाऱ्या गोष्टींमुळे दिग्दर्शक मर्यादित स्वरूपात यशस्वी झाला आहे.
वीरा त्रिपाठी ही गडगंज श्रीमंत, उच्चभ्रू आणि राजकीयदृष्टय़ा शक्तिशाली उद्योगपतीची मुलगी आपल्या होणाऱ्या नवऱ्याबरोबर लग्नाच्या तीन-चार दिवस आधीच्या एका मध्यरात्री कारने फिरायला जाते. पेट्रोलपंपावर पेट्रोल भरण्यासाठी थांबल्यानंतर जोरजोरात गोळीबाराचे आवाज येतात आणि काही पिस्तूलधारी गुंड पलायन करताना आपल्यावर गोळी चालू नये म्हणून वीरा त्रिपाठीचे अपहरण करतात. लग्नाच्या रीतीभातींना कंटाळलेली वीरा मोकळा श्वास घेण्यासाठी घटकाभर घरातून बाहेर पडते आणि अपहरणाने तिचे आयुष्य बदलून जाते. सुरुवातीला अपहरण करणारे गुंड, त्यांनी केलेली मारहाण आणि अचानक एका ट्रकमध्ये कोंबून करावा लागणारा प्रवास यामुळे धक्का बसलेली वीरा काही कालावधीनंतर अपहरण नव्हे तर अनोळखी माणसासोबत एका न संपणाऱ्या सहलीला निघाल्यासारखी वागू लागते. अपहरणकर्ता महाबीर भट्टी हा खतरनाक गुन्हेगार तिला मित्र वाटू लागतो. अपरहण झाल्यानंतर एका निर्जन आणि अभावित ठिकाणी पोहोचल्यानंतर भेदरलेली वीरा; आपले सुखासीन परंतु बंदिस्त जीवन संपून एका निरंतर प्रवास तोही एका अट्टल गुन्हेगारासोबत करू पाहते.
बॉलीवूडच्या तद्दन चित्रपटांपेक्षा निश्चितच आशय-विषयाच्या बाबतीत वेगळा ठरणारा ‘हायवे’ हा चित्रपट दोन वेगवेगळ्या स्तरांतील तरुण-तरुणींचा सहा राज्यांत रस्त्यावरून ट्रकने केलेला प्रवास, अभावित ठिकाणी केलेले वास्तव्य यामुळे प्रेक्षणीय झाला आहे. चित्रपटाच्या पहिल्या चित्रचौकटीपासूनच रोड मूव्ही प्रकारातला चित्रपट दाखविण्यासाठी छायालेखकाने आपल्या कॅमेऱ्यात कैद केलेली अप्रतिम दृश्ये हे या चित्रपटाचे सामथ्र्य आहे. कच्छचे रण असो की हिमाचल प्रदेशमधील डोंगराळ प्रदेश, निर्मनुष्य लांबच लांब जाणारे रस्ते असोत की पंजाबमधील शेते सर्व प्रदेशांचे चित्रीकरण अप्रतिम असल्यामुळे चित्रपट नेत्रसुखद झाला आहे. पण.. तरीही चित्रपटाचा आस्वाद घेण्यात अडचणी निर्माण केल्या आहेत.
एका अतिश्रीमंत घरातील शिकलेली तरुणी अपहरण झाल्यानंतर केवळ एका दृश्यात चटकन अपहरणकर्त्यां गुन्हेगारी वृत्तीच्या गावरान, रावडी महाबीरच्या प्रेमात पडते. त्याला घाबरत नाही हे मुळातच पटत नाही. हायवे या चित्रपटासारखे अनेक चित्रपट इंग्रजी व अन्य परदेशी भाषांमध्ये येऊन गेले आहेत, प्रेक्षकांना चांगलेच पाठ आहेत. त्यामुळे रोड मूव्ही प्रकारच्या चित्रपटांमध्ये अपेक्षित असलेले अनपेक्षित गोष्टींचे धक्के प्रेक्षकाची उत्कंठा वाढविण्यासाठी आवश्यक असतात. त्यालाच दिग्दर्शकाने मूठमाती दिली आहे.
एकदा वीरा ही महाबीरच्या प्रेमात पडल्यानंतर, प्रेम व्यक्त केल्यानंतर तिला प्रवासात कुठेतरी वेश्यावस्तीत जाऊन विकण्याचा विचार करणारा निर्ढावलेला गुंड महाबीर पाघळतो. त्याचे मन द्रवते आणि त्याला त्याच्या आईची आठवण होते. मग दिग्दर्शक आपल्याला थेट महाबीरच्या तान्हेपणाची दृश्य दाखवतो. निर्ढावलेला गुंड असूनही महाबीर आपला सहकारी गुंड वीराशी लगट करायला जातो तेव्हा कमालीचा चिडतो असे दाखविल्यामुळे साहजिकच वीरा त्याच्या प्रेमात पडते. हे चित्रपटातील दृश्यापुरते सयुक्तिक वाटले तरी मुळात पटणारे नाही.
त्यात लेखक-दिग्दर्शकाने वीरा आठ-नऊ वर्षांची असताना कुटुंबातील जवळच्या नातेवाईक असलेल्या एका काकांनी तिचे लैंगिक शोषण केल्याचे सांगते. तो प्रसंग आणि त्याचे चित्रपट संपताना पुन्हा वीराने सूतोवाच करून त्या काकाला धडा शिकविण्याचा वीराचा प्रयत्न या प्रसंगांमुळे मध्यांतरानंतर थोडय़ा वेगळ्या वळणावर प्रेक्षकाला परिणामकारक वाटणारा चित्रपट एकदम बॉलीवूडच्या तद्दन चित्रपटासारखा वाटू लागतो. कथानकातील कच्चे दुवे खूप राहिल्यामुळे वीरा-महाबीरचा हा रस्ता प्रवास मर्यादित स्वरूपात पटतो. उत्तम छायालेखन, उत्तम संगीत आणि रावडी स्वरूपाचा रांगडा गुंड साकारल्याचा रणदीप हुडाचा अभिनय यामुळे चित्रपट सुसह्य़ ठरतो. परंतु अल्लड दिसणाऱ्या वीरा ऊर्फ आलिया भटचे चित्रपटातील नेमके वय किती याचा प्रेक्षकाला केवळ अंदाज बांधत राहावे लागते. त्यामुळे तिच्याकडून दिग्दर्शकाने अभिनय बऱ्यापैकी करवून घेतला असला तरी वीरा या व्यक्तिरेखेला आलिया भट पुरेपूर न्याय देऊ शकलेली नाही.
हायवे
निर्माते : साजिद नाडियादवाला, इम्तियाज अली
लेखक-दिग्दर्शक – इम्तियाज अली
छायालेखन – अनिल मेहता
संगीत – ए आर रेहमान
कलावंत – आलिया भट, रणदीप हुडा, सहर्ष कुमार शुक्ला, दुर्गेश कुमार व अन्य
Movie review by Anupama Chopra: Highway interesting but…
Highway, Movie review, Anupama Chopra, loksatta news, loksatta, marathi news
औत्सुक्यपूर्ण तरीही..