शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे भारावून टाकणारे व्यक्तिमत्व, वक्तृत्व आणि करिश्मा याचा अनुभव अवघ्या महाराष्ट्राने अनुभवला. त्यामुळे बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवरील चित्रपट म्हणून ‘बाळकडू’ या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण होणे स्वाभाविकच म्हटले पाहिजे. बाळासाहेब ठाकरे यांच्यावरील चित्रपटात बाळासाहेबांची भूमिका कोण साकारणार इथपासून ते बाळकडू म्हणजे नेमकं काय याची उत्कंठा प्रेक्षकांना लागून राहिली होती. व्हॉट्सअॅपवरही याची चर्चा रंगली होती. ‘बाळकडू’ या चित्रपटाद्वारे चित्रपटकर्त्यांनी ध्वनिरूपाने बाळासाहेब ठाकरे यांचे व्यक्तिमत्व दाखवले आहे. या चित्रपटाचे आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे २३ जानेवारी या बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनी तो प्रदर्शित झाला आहे. तान्ह्य़ा बाळाची तब्येत चांगली राहावी म्हणून त्याला बाळकडू पाजले जाते. या चित्रपटाद्वारे बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे बाळकडू आजच्या पिढीतील तरुणाईपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा प्रयत्न ‘बाळकडू’ या चित्रपटाद्वारे करण्यात आला आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा