भयपट, भूतपट, थरारपट म्हटले की प्रेक्षकांना सगळ्यात आधी रामसेंचे चित्रपट आठवतात, मग विक्रम भटचे आठवतात आणि रागिणी एमएमएसच्या यशामुळे आता एकता कपूर निर्मित चित्रपटांचा क्रमांक प्रेक्षक लावतील. ‘रागिणी एमएमस २’ या चित्रपटात सनी लिओन ही ‘पोर्नस्टार’ आहे हे समजल्यापासून हा चित्रपट ‘बहुचर्चित’ ठरणे स्वाभाविक होते. त्यामुळे सनी लिओनला पडद्यावर अखंड दोन-तीन तास पाहायला मिळणार हे गृहीत धरूनच प्रेक्षक चित्रपटगृहांकडे वळतात. परंतु, सरधोपट भयपट न बनविता दिग्दर्शकाने ‘सेक्स’, भय आणि विनोदी यांची सरमिसळ करीत उत्तम करमणूक केली आहे. गोष्टीत फारसा दम नसला तरी प्रेक्षकाला खिळवून ठेवण्यात चित्रपट नक्कीच यशस्वी झाला आहे. मात्र एक गोष्ट नमूद करायला हवी ती म्हणजे एमएमएस या शब्दाचा काहीएक संबंध चित्रपटात नाही.
भयपटांचा फॉम्र्युला बॉलीवूडच्या रुपेरी पडद्यावर नेहमी ठरीवच असतो. गेला बाजार एखाद्या उत्तम इंग्रजी भयपटांतील दृश्ये जशीच्या तशी आपल्याकडील नायिकेसोबत दाखवली तरी गल्लापेटीवर यश मिळते असा सहजपणे निर्माते अंदाज बांधतात. प्रौढांसाठीचे चित्रपट हल्ली इंटरनेटच्या सहज वापराने फक्त इंटरनेटवरच पाहिले जातात. त्यामुळे गल्लापेटीवर हमखास यशस्वी होण्यासाठी भयपटांमधून लैंगिक दृश्ये, ओलेती नायिका दाखविण्याचा प्रयत्न निर्मात्यांनी या चित्रपटांत भरपूर केला आहे. मुळातच ‘पोर्नस्टार’ अशी प्रतिमा असलेल्या सनी लिओनला रागिणीच्या प्रमुख भूमिकेसाठी घेण्यातच चित्रपटाचे निम्मे यश निश्चित झाले आहे.
सिनेमात सिनेमा हा फॉम्र्युला दिग्दर्शकाने या चित्रपटात वापरला आहे. एक रॉक्स नावाचा दिग्दर्शक बॉलीवूडमध्ये यशस्वी ठरण्यासाठी भयपटाचा ‘सॉलिड फॉम्र्युला’ वगैरे आणतोय असे जाहीर कार्यक्रमात सांगून ‘रागिणी’च्या भूमिकेसाठी सनी लिओनला चित्रपटाच्या मुहूर्ताला लोकांसमोर आणतो असे दाखवूनच चित्रपटाची सुरुवात केली आहे. ज्या बंगल्यात रागिणीची गोष्ट घडते त्याच बंगल्यात जाऊन चित्रीकरण करण्याची कल्पना लेखक सत्या दिग्दर्शकाला देतो आणि रॉक्सला ही कल्पना खूप आवडते. म्हणून रागिणी, सत्या आणि रॉक्स तिघेही त्या बंगल्यात जातात. या बंगल्याचे वैशिष्टय़ म्हणजे इथे भूत आहे म्हणून लोकांनी बंगला व परिसरात फक्त सूर्योदयानंतर यावे व सूर्यास्तापूर्वी परत जावे असा सरकारने बोर्ड लावलेला आहे. त्यामुळे दिग्दर्शक, रागिणी साकारणारी नायिका सनी लिओन आणि लेखक सत्या व त्यांच्याबरोबर दोन-तीन छोटय़ा छोटय़ा भूमिका करणारे कलावंत या बंगल्यात वास्तव्य करतात व चित्रीकरणातील अन्य लोक जवळपासच्या हॉटेलात वास्तव्य करतात असे दाखवून दिग्दर्शकाने अनेक गोष्टी भयंकर घडणार याचे आपोआपच सूचन केले आहे.
भयपटाला सत्य घटनेचा आधार देण्याचा प्रयत्न लेखक-दिग्दर्शकांनी केला आहे. तसेच त्याच्या मांडणीमध्ये तर्कसुसंगतता आणल्यामुळे चित्रपट करमणूक करतो. चेटकिणीने झपाटलेली रागिणी ही खरी व्यक्तीही जिवंत असून तिच्यावर मनोरुग्णालयात उपचार सुरू आहेत असे दाखविले आहे. त्यामुळे प्रेक्षक खरी रागिणी आणि रागिणीची भूमिका करणारी व्यक्तिरेखा यांची सहज तुलना करतो. चित्रीकरणादरम्यान भयपटात अपेक्षित असलेले धक्के देत अनेक गमतीजमती चित्रपटात दाखविल्या आहेत. त्यामुळे चांगले रंजन होते. रूढार्थाने भयपट न करता, पुरुष प्रेक्षकांना चालवणारी सनी लिओनची कामुक दृश्ये दाखवून भयपटाचा फॉम्र्युला मोडीत काढत दिग्दर्शकाने चित्रपट रंजक केला आहे.
रहस्याची उकल करताना घेतलेली मानसोपचारतज्ज्ञाची मदत, धार्मिक गोष्टींची घातलेली सांगड यामुळे चित्रपटाची गोष्ट पटविण्यात दिग्दर्शक यशस्वी ठरतो. परंतु, फार गोष्टीत अडकून न पडताही चित्रपट करमणूक करण्यात यशस्वी ठरतो. अर्थात पुरुष प्रेक्षकांची करमणूक हेच इथे अधोरेखित करावे लागेल. भयपट असल्यामुळे आणि सनी लिओन असल्यामुळे अभिनय वगैरेची कसोटी या चित्रपटाला लावता येणार नाही.
सनी लिओन दिग्दर्शक रॉक्सीला चित्रीकरणाच्या सुरुवातीला सांगते की, रागिणीची गोष्ट चित्रपटात आहे तर रागिणीला भेटणे आवश्यक आहे. त्यावर रॉक्सी तिला म्हणतो, ‘पोनरे से ऋतुपनरे कैसे बन गयी’ अशा पद्धतीच्या संवादातून विनोदनिर्मितीचा प्रयत्न केला आहे.
भयपटाचा ‘सेक्स फॉम्र्युला’
भयपट, भूतपट, थरारपट म्हटले की प्रेक्षकांना सगळ्यात आधी रामसेंचे चित्रपट आठवतात, मग विक्रम भटचे आठवतात आणि रागिणी एमएमएसच्या यशामुळे आता एकता कपूर निर्मित चित्रपटांचा क्रमांक प्रेक्षक लावतील. ‘रागिणी एमएमस २’ या चित्रपटात सनी लिओन ही ‘पोर्नस्टार’ आहे हे समजल्यापासून हा चित्रपट ‘बहुचर्चित’ ठरणे स्वाभाविक होते.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 23-03-2014 at 07:01 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Movie review sunny leone shines sex formula in the horror film ragini mms