रसिकांना एकदा चित्रपट आवडला की, त्या चित्रपटाच्या यशाचा मुसळधार पाऊस कडाक्याची थंडी व प्रचंड उष्णता अशा गोष्टी रोखू शकत नाहीत याचा प्रत्यय यावर्षीच्या पावसाळ्यात यशस्वी ठरलेल्या चित्रपटांनी दिला आहे. दीड-दोन महिने सातत्याने पाऊस पडत असूनही ‘रांझणा’ व ‘भाग मिल्खा भाग’ यांची उत्तम तर रमैय्या वस्तावय्या व लुटेरान साधारण स्वरुपाचे यश प्राप्त केले.
तर दरवर्षी पावसापासून पळ काढणाऱया मराठी चित्रपटांना यंदा मात्र यशाचा गारवा लाभला आहे. झपाटलेला-२ व दुनियादारी यांनी उत्तम यश प्राप्त केले. तर, खो-खोन साधारण स्वरूपाचे यश मिळविले. या यशाने सप्टेंबरच्या मध्यापर्यंत थांबणाऱया पावसाळ्यापर्यंत अधिकच उत्साहाने मराठी व हिंदी चित्रपट प्रदर्शित व्हावेत.
यापूर्वी जंजीर, बॉबी, शोले, सागर, राम तेरी गंगा मैली, १९४२ अ लव्ह स्टोरी, मोहरा, हम आपके है कौन, रंगीला, कोई..मिल गया, जाने तू या जाने ना हे चित्रपट अशाच पावसाळ्यात प्रदर्शित होऊन यशस्वी ठरले. शाळा-कॉलेजेस् सुरू झाली की उत्साही वातावरण, पावसाळ्याचे धुंद वातावरण व विविध सणांच्या रजा या साऱयामुळे ‘चित्रपट पहावयास वाटणे’ असे वातावरण निर्माण होते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा