मुकेश अंबानींच्या जिओ सिनेमा अॅपवर लवकरच हॅरी पॉटर, गेम्स ऑफ थ्रोन्स आणि मॅट्रिक्स सारखे चित्रपट पाहायला मिळणार आहेत. यासाठी Viacom18 ने हॉलिवूडच्या प्रसिद्ध प्रोडक्शन हाऊस वॉर्नर ब्रदर्सशी करार केला आहे. तसेच मुकेश अंबानी यांच्या कंपनीने एचबीओ कंटेंटसाठीसुद्धा करार केला आहे. या करारानंतर जिओ सिनेमा भारतात अॅमेझॉन आणि हॉटस्टारला टक्कर देईल. वॉर्नर ब्रदर्सकडे अनेक आयकॉनिक चित्रपटांची यादी आहे, ज्यांना भारतातही खूप पसंती दिली जाते. तसेच HBO ची दर्जेदार सामग्री जिओ सिनेमाला आणखी मजबूत करण्यात मदतशीर ठरेल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अॅमेझॉन प्राइम आणि हॉटस्टार यांच्यात स्पर्धा होणार

मुकेश अंबानींच्या रिलायन्स जिओने वॉर्नर ब्रदर्ससोबत त्याच्या प्रसारण उपक्रमासाठी करार केला आहे. या करारानुसार हॉलिवूड चित्रपट निर्मात्यांचे सर्व चित्रपट जिओ सिनेमात दाखवले जातील. या टप्प्यामुळे जिओ सिनेमाचा आवाका तर वाढेलच, पण त्याला Amazon आणि Hotstar च्या बरोबरीने स्पर्धेत उभे राहण्यासही मदत होणार आहे. या डीलमुळे केवळ वॉर्नर ब्रदर्सच नाही तर एचबीओचा कंटेंटही जिओ सिनेमात दिसणार आहे. तसेच जिओ सिनेमाचा पोर्टफोलिओ अधिक मजबूत होईल, कारण HBO च्या कंटेंटला भारतात खूप पसंती दिली जाते. आतापर्यंत या कराराच्या मूल्याबाबत माहिती प्राप्त झालेली नाही.

हेही वाचाः महारेराच्या वारंटस वसुलीसाठीचा पनवेलचा लिलाव यशस्वी, महारेराच्या सततच्या पाठपुराव्याला मोठे यश

फक्त जिओ सिनेमात कंटेंट असेल

ET च्या अहवालानुसार, दोघांमधील ही भागीदारी महत्त्वाची आहे आणि वॉर्नर ब्रादर्सची बहुतेक सामग्री Jio सिनेमा प्लॅटफॉर्मवर पाहता येणार आहे. वॉर्नर ब्रदर्स अॅमेझॉन प्राइम आणि हॉटस्टारला त्यातील बहुतेक लोकप्रिय सामग्री देऊ शकणार नाहीत. तज्ज्ञांच्या मते, ही अशी भागीदारी आहे की, जिओ सिनेमा वॉर्नर ब्रदर्स आणि एचबीओचे दुसरे घर बनेल. या डीलवर वॉर्नर ब्रदर्स आणि वायकॉम १८ कडून कोणतेही विधान आलेले नाही.

हेही वाचाः वडिलांच्या संपत्तीवर मुलाचा किंवा मुलीचा अधिकार असतो का? कायदा काय सांगतो?

Jio ला मोठा फायदा होणार

जिओ सिनेमावर हजारो तासांची स्ट्रीमिंग सामग्री आणण्यात या करारामुळे मदत होणार आहे. विशेष बाब म्हणजे जिओ सिनेमाने आयपीएलच्या फ्री स्ट्रीमिंगद्वारे खूप लोकप्रियता मिळवली आहे. Viacom18 ने २०२३ ते २०२७ या कालावधीत सुमारे २.९ बिलियन डॉलरमध्ये IPL डिजिटल स्ट्रीमिंग अधिकार विकत घेतले आहेत. यापूर्वी हे हक्क डिस्ने हॉटस्टारकडे होते. जिओ सिनेमाने आयपीएलच्या माध्यमातून अनेक विक्रम केले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, जिओ सिनेमावर लवकरच सबस्क्रिप्शन सुरू होणार आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Movies like harry potter games of thrones can now be seen on mukesh ambani jio cinemas vrd