या आठवड्यात सिनेरसिकांसाठी दोन चित्रपटांची मेजवानी आहे. मराठीत ‘तुझी माझी लव्हस्टोरी’ तर बॉलीवूडमध्ये ‘हमशकल्स’ हे दोन चित्रपट येत्या शुक्रवारी २० जूनला प्रदर्शित होत आहेत.
मराठीमध्ये प्रदर्शित होणा-या ‘तुझी माझी लव्हस्टोरी’ या चित्रपटात गौरव घाटणेकर आणि श्रुती मराठे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. खासगी आयुष्यातही प्रियकर प्रेयसी असलेली ही जोडी पहिल्यांदाच पडद्यावर एकत्र दिसेल. चित्रपटात इंद्रनील आणि अदिती यांची अनोखी ‘लवस्टोरी’ प्रेक्षकांना पहावयास मिळेल. योगायोगाने अदितीच्या सहवासात आलेला इंद्रनील तिच्या प्रेमात पडतो. त्यादरम्यान त्याला अनपेक्षित प्रसंगांना सामोरे जावे लागते. प्रेम व्यक्त करण्याच्या इंद्रनीलच्या प्रयत्नांना अदिती काय आणि कसा प्रतिसाद देते, यावर ‘तुझी माझी लवस्टोरी’ ची कथा बेतली आहे.
या पाच कारणांसाठी पाहा ‘हमशकल्स’
दुसरीकडे बॉलीवूडमध्ये ‘हमशकल्स’ हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात सैफ अली खान, रितेश देशमुख आणि राम कपूर यांच्या तिहेरी भूमिका आहेत. यामुळे, चित्रपटातील व्यक्तिरेखांमध्ये निर्माण होणारा गोंधळ आणि संभ्रम यात पहावयास मिळेल. साजिद खानचे दिग्दर्शन असलेल्या ‘हमशकल्स’ या विनोदीपटात बिपाशा बसू, तमन्ना भाटिया आणि इशा गुप्ता यांच्यादेखील प्रमुख भूमिका आहेत.

Story img Loader