६ ऑक्टोबर रोजी कोल्हापूरच्या विशाल पिंजानीने यंदाची ‘मिस्टर गे इंडिया २०२३’ ही स्पर्धा जिंकली. विशाल दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊनमध्ये होणार्‍या ‘मिस्टर गे वर्ल्ड २०२३’ स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे. विशालने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत समलैंगिकता स्वीकारताना सहन कराव्या लागलेल्या त्रासाबद्दल भाष्य केलं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“माझे जन्मगाव…”, ‘मिस्टर गे इंडिया २०२३’ बनल्यावर कोल्हापूरच्या विशाल पिंजानीची पोस्ट

वयाच्या १६ व्या वर्षी विशालला तो समलैंगिक असल्याची जाणीव झाली. आता ४० वर्षांचा असलेला विशाल व्यवसायाने ग्रंथ प्रकाशक आणि पुस्तक विक्रेता आहे. ‘बीबीसी मराठी’ला दिलेल्या मुलाखतीत विशाल म्हणाला, “एकेदिवशी माझ्या एका मित्राने ‘तू गे आहेस का’? असं विचारलं. तेव्हापर्यंत मी गे हा शब्द ऐकलाही नव्हता. त्या शब्दाचा अर्थ माहीत नसल्याचं मी त्याला म्हणालो. त्याने ज्या टोनमध्ये तो शब्द वापरला, त्यावरून तो शब्द खूप वाईट असावा किंवा कुठलातरी आजार असावा असं मला वाटलं. मी ऑनलाइन हा शब्द शोधला आणि तेव्हा मला कळालं की गे म्हणजे समलैंगिक पुरुष. त्यानंतर मी गे आहे, असं मला समजलं. तोपर्यंत माझ्या भावनांमुळे मला असं वाटायचं की जगातील मी एकटाच असा पुरुष आहे, ज्याला स्त्रियांचं नाही तर पुरुषांचं आकर्षण आहे.”

“हे नवरे लोक फोटोत…”, हेमांगी कवीच्या ‘त्या’ कमेंटवर वनिता खरातच्या नवऱ्याने दिलं उत्तर; म्हणाला, “मी मनात…”

एकदा काही मुलांनी मारलं होतं, तो प्रसंग विशालने सांगितला. “शाळेत मी वर्गात गेलो की मुलं मला मुलींच्या रांगेत जाऊन बस, असं म्हणायची. एकदा तर १५-२० मुलांनी मला ज्यूस सेंटरमध्ये नेऊन मारलं आणि शिवीगाळ केली. आमच्याकडे असं चालत नाही, असं बोलू लागले. या सगळ्या गोष्टी मी घरी सांगू शकत नव्हतो, कारण त्यांना टेन्शन आलं असतं. मनात आत्महत्येचे विचार यायचे, मी स्वतःचा जीव घेण्याचा प्रयत्नही केला,” असा खुलासा विशालने केला.

पुढे विशाल म्हणाला, “काही काळाने मी माझ्या लैंगिकतेबद्दल घरी सांगितलं, पण पालकांनी लगेच स्वीकारलं नाही. मी नैराश्यात होतो त्यामुळे त्यांनी माझी चांगली काळजी घेतली. कालांतराने त्यांच्या मनातील चुकीच्या धारणा मी त्यांना योग्य माहिती देऊन बदलल्या. एकेदिवशी रात्री बहिणीने उठून मला मारलं. ‘तू आमचं नाव खराब केलंस तर आमचं लग्न कसं होणार, आम्हाला स्थळं कशी येणार?’ असं तिचं म्हणणं होतं. खरं तर त्यावेळी ते सगळे तसे का वागत होते, ते मला कळत होतं कारण त्यांना व्यक्त व्हायची दुसरी पद्धतच माहीत नव्हती,” असं विशाल म्हणतो. सध्या विशाल मित्रांबरोबर मिळून समलैंगिक लोकांसाठी ‘अभिमान’ नावाची संस्था चालवतो.