गेली अनेक वर्ष आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या अभिनेत्री म्हणजे मृणाल कुलकर्णी. मराठी बरोबरच हिंदी मनोरंजन सृष्टीतही त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. सोशल मीडियावर सक्रिय राहत त्या त्यांचे विचार चाहत्यांची शेअर करत असतात. आता नवीन वर्षानिमित्त त्यांनी एक खास पोस्ट केली आहे.
मृणाल कुलकर्णी नेहमीच काही फोटो, त्यांच्या आयुष्यात घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडी, त्यांना आलेले अनुभव चाहत्यांशी सोशल मीडिया वरून शेअर करत असतात. आताही नवीन वर्षानिमित्त त्यांनी त्यांचा एक फॅमिली फोटो शेअर करत चाहत्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या.
आणखी वाचा : केतकी चितळेला राग अनावर! ट्रोलरला शिवी देत म्हणाली, “तुमच्या पिढीला…”
मृणाल कुलकर्णी यांनी फॅमिली फोटो शेअर करत पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिलं, “प्रत्येक वर्ष एखाद्या पुस्तकासारखंच असतं…पुस्तक, ३६५ दिवसांचं! जसं नवं पान पलटू तसं काही नवंच मिळत जाईल.. आणि आयुष्य अधिक रंगतदार होईल…नववर्षाच्या आनंददायी शुभेच्छा ! अॅड. रूचिर, मृणाल विराजस आणि शिवानी.”
![](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2023/01/mrinal-kulkarni-.jpg?w=324)
हेही वाचा : मृणाल कुलकर्णींना कौतुक सूनबाईंचं! शिवानीसाठी खास पोस्ट शेअर करत म्हणाल्या…
त्यांची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यांचे चाहते या फोटोवर भरभरून कमेंट्स करत आहेत. अनेकांनी त्यांचा हा फोटो आवडला असं सांगून त्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांची ही पोस्ट सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे.