चित्रपट-मालिकांत अभिनय, पुस्तकाच्या लेखन क्षेत्रात नशीब आजमवणा-या मृणाल कुलकर्णीने ‘प्रेम म्हणजे प्रेम असतं’ या चित्रपटाद्वारे दिग्दर्शनात पदार्पण केले होते. आता ती ऐतिहासिक प्रेमकहाणी ‘रमा माधव’चे दिग्दर्शन करणार आहे. हा चित्रपट ‘स्वामी’ या मालिकेचा रिमेक असून, याच मालिकेद्वारे मृणालने २५ वर्षापूर्वी आपल्या अभिनयाला सुरुवात केली होती.
‘स्वामी’ या प्रसिद्ध पुस्तकावर आधारित असलेला ‘रमा माधव’ हा मराठी चित्रपटसृष्टीतील बिग बजेट चित्रपट असल्याचे मृणालचे म्हणणे आहे. या चित्रपटाचे ३७ दिवस पुण्यात चित्रीकरण करण्यात आले असून, याच्या डबिंगचे काम सध्या सुरु आहे. चित्रपट प्रदर्शनाची तारीख अद्याप ठरलेली नाही. स्वामी मालिकेत मुख्य भूमिका साकारणारे मृणाल कुलकर्णी आणि रवींद्र मनकाणी मात्र चित्रपटात छोट्या भूमिका साकारणार आहेत. मुख्य भूमिकेत एक नवी जोडी प्रेक्षकांना पाहावयास मिळेल.
मृणालने २०१३साली पहिल्यादांच दिग्दर्शन केलेला ‘प्रेम म्हणजे प्रेम असतं’ने चांगला गल्ला जमवला होता.
‘रमा माधव’चे दिग्दर्शन करणार मृणाल कुलकर्णी
चित्रपट-मालिकांत अभिनय, पुस्तकाच्या लेखन क्षेत्रात नशीब आजमवणा-या मृणाल कुलकर्णीने 'प्रेम म्हणजे प्रेम असतं' या चित्रपटाद्वारे दिग्दर्शनात पदार्पण केले होते.
First published on: 13-06-2014 at 01:48 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mrinal kulkarni to direct rama madhav