चित्रपट-मालिकांत अभिनय, पुस्तकाच्या लेखन क्षेत्रात नशीब आजमवणा-या मृणाल कुलकर्णीने ‘प्रेम म्हणजे प्रेम असतं’ या चित्रपटाद्वारे दिग्दर्शनात पदार्पण केले होते. आता ती ऐतिहासिक प्रेमकहाणी ‘रमा माधव’चे दिग्दर्शन करणार आहे. हा चित्रपट ‘स्वामी’ या मालिकेचा रिमेक असून, याच मालिकेद्वारे मृणालने २५ वर्षापूर्वी आपल्या अभिनयाला सुरुवात केली होती.
‘स्वामी’ या प्रसिद्ध पुस्तकावर आधारित असलेला ‘रमा माधव’ हा मराठी चित्रपटसृष्टीतील बिग बजेट चित्रपट असल्याचे मृणालचे म्हणणे आहे. या चित्रपटाचे ३७ दिवस पुण्यात चित्रीकरण करण्यात आले असून, याच्या डबिंगचे काम सध्या सुरु आहे. चित्रपट प्रदर्शनाची तारीख अद्याप ठरलेली नाही. स्वामी मालिकेत मुख्य भूमिका साकारणारे मृणाल कुलकर्णी आणि रवींद्र मनकाणी मात्र चित्रपटात छोट्या भूमिका साकारणार आहेत. मुख्य भूमिकेत एक नवी जोडी प्रेक्षकांना पाहावयास मिळेल.
मृणालने २०१३साली पहिल्यादांच दिग्दर्शन केलेला ‘प्रेम म्हणजे प्रेम असतं’ने चांगला गल्ला जमवला होता.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा