छोट्या पडद्यावरील अभिनेत्री मृणाल दुसानीस ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. ‘माझिया प्रियाला प्रित कळेना’ या मालिकेतून मृणाल घरा घरात पोहोचली. मृणालने तिच्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली. गेल्या काही दिवसांपासून मृणालने छोट्या पडद्यावरून ब्रेक घेतला होता. या सगळ्यात मृणालने तिच्या चाहत्यांना गूड न्यूज दिली आहे.
मृणाल नुकतीच आई झाली असून तिने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ही माहिती दिली आहे. मृणालने मुलीला जन्म दिला आहे. हा फोटो शेअर करत “Daddy’s little girl and mumma’s whole world ..!!! Our little princess has arrived..!! ? Nurvi .. 24.03.2022”, असे कॅप्शन मृणालने दिले आहे.
आणखी वाचा : Live Chat दरम्यान पतीच्या कर्करोगाविषयी बोलताना अभिज्ञा भावे झाली भावूक, म्हणाली…
मृणालची ही पोस्ट पाहिल्यानंतर नेटकऱ्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत अनेकांनी यावर कमेंच करत तिला शुभेच्छा दिल्या आहेत. मृणालच्या मुलीचे नाव नूरवी आहे. पण मृणालने शेअर केलेल्या या फोटोत तिच्या मुलीचा चेहरा दिसत नाही आहे. तर तिच्या मुलीचा जन्म हा २४ मार्च रोजी झाला आहे.