Mrunal Thakur : ‘मुझसे कुछ कहती…ये खामोशियां’ या मालिकेतून अभिनेत्री मृणाल ठाकूरने मनोरंजनविश्वात पदार्पण केलं. मात्र, झी टीव्हीवरील ‘कुमकुम भाग्य’ मालिकेमुळे तिला खऱ्या अर्थाने प्रसिद्धी मिळाली. टेलिव्हिजनविश्व गाजवल्यावर अभिनेत्री पुन्हा एकदा चित्रपटांकडे वळली. ‘सुपर ३०’ चित्रपटात मृणालने हृतिक रोशनबरोबर स्क्रीन शेअर केली होती. काही बॉलीवूड चित्रपटांमध्ये काम केल्यावर अभिनेत्री दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीकडे वळली.

मृणाल ठाकूरने ( Mrunal Thakur ) गेल्या काही वर्षात ‘हाय नाना’, ‘सीतारामम’, ‘द फॅमिली स्टार’ अशा गाजलेल्या साऊथ चित्रपटांमध्ये काम केलंय. अभिनेत्रीचे हे तिन्ही सिनेमे प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले आहेत. विशेषत: ‘हाय नाना’ आणि ‘सीतारामम’सारख्या चित्रपटांनी प्रेक्षकांच्या मनावर एक वेगळी मोहोर उमटवली. पण, फार कमी लोकांना माहितीये की, साऊथ इंडस्ट्री गाजवणारी मृणाल ही मूळची धुळ्याची आहे.

हेही वाचा : “महालक्ष्मीचं व्रत केलं ना…”, मेहेंदळे कुटुंबावरील संकट दूर करण्यासाठी सावली काय करणार? पाहा ‘सावळ्याची जणू सावली’चा प्रोमो

मृणालचा जन्म १९९२ मध्ये महाराष्ट्रातील धुळ्यात झाला. मोजक्याच पण कथेच्या दृष्टीकोनातून दमदार अशा चित्रपटांमध्ये काम करून अभिनेत्रीने प्रसिद्धी मिळवली. धुळ्यात मराठी कुटुंबात जन्म झाल्याने मृणालला व्यवस्थित मराठी भाषा बोलता येते. पण, इतकंच नव्हे तर अभिनेत्रीला व्यवस्थित अहिराणी, खानदेशी भाषेत सुद्धा संवाद साधता येतो. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

मृणाल ठाकूरला ( Mrunal Thakur ) तिच्या चाहत्याने, “तुम्हाला अहिराणी येते का?” असा प्रश्न विचारला. यावर अभिनेत्री म्हणाली, “तुम्हाला काय वाटस मला अहिराणी नाही येत, अहिराणी-खानदेशी भाषांवर माझं विशेष प्रेम आहे. मी तशीही तिकडची आहे, त्यामुळे मला या भाषेत संवाद साधता येतो. माझी आजी माझ्याशी अहिराणी भाषेत बोलायची.”

हेही वाचा : “विमान प्रवासात मास्तरीणबाई म्हणून हाक मारली…”, हवाईसुंदरीने लिहिलं शिवानी रांगोळेसाठी खास पत्र, शेअर केले फोटो

Mrunal Thakur
मृणाल ठाकूरच्या व्हिडीओवर नेटकऱ्यांच्या कमेंट्स ( Mrunal Thakur )

हेही वाचा : ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिका संपणार! ४ वर्षे गाजवलं अधिराज्य, शेवटच्या दिवसाच्या शूटिंगचा व्हिडीओ आला समोर

मृणालने पुढे या व्हिडीओमध्ये, तिची आजी खिचडी कशी बनवायची हे अहिराणीमध्ये सांगितलं. अभिनेत्रीचा हा देसी अंदाज पाहून नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. “मृणाल अहिराणी बोलतेय हे पाहून बरं वाटलं”, “हे आमच्यासाठी मोठं सरप्राइज होतं”, “आम्हाले अभिमान शे ताईसाहेब”, “भारीच…तू तुझी भाषा आजही विसरली नाहीयेस”, “शेवटी धुळ्याची मुलगी” अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर केल्या आहेत.

Story img Loader