बॉलिवूड अभिनेत्री मृणाल ठाकूर ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. मृणालने तिच्या करिअरची सुरुवात ही छोट्या पडद्यावरून केली होती. तर नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत मृणालने तिला अभिनेत्री नाही तर क्राईम जर्नलिस्म करायंच होतं आणि टिव्हीवर दिसायंच होतं, असा खुलासा केला आहे. पण तिच्या आई-वडिलांची ही इच्छा होती की तिने डेन्टिस्ट व्हावे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मृणालने नुकतीच YouTuber रणवीर अल्लाबदियाला मुलाखत दिली होती. या मुलाखतीत तिच्या करिअरच्या सुरुवातीच्या स्ट्रगलविषयी सांगितले आहे. “माझ्यावर त्यावेळी खूप जबाबदाऱ्या होत्या. तेव्हा मला वाटायचे की मी हे जर नीट केलं नाही तर माझं करिअर काहीच होणार नाही. मला वाटायचे की २३ व्या वर्षी माझे लग्न होईल आणि मला मुलं असतील आणि मला तेच नको होतं. मला काहीतरी वेगळं करायचं होतं आणि मी त्यावेळी ऑडिशन देत होती. तर असे बऱ्याच गोष्टी होत्या जेव्हा मला वाटायंच की मला कोणतंच काम येत नाही”, असे मृणाल म्हणाली.

आणखी वाचा : “अपमानानंतरही अक्षय कुमार जर कपिल शर्मा शोमध्ये आला तर मी…”, अभिनेत्याचे ट्वीट चर्चेत

पुढे आत्महत्येविषयी तिला येणाऱ्या विचारांविषयी मृणाल म्हणाली, “मी लोकल ट्रेनने प्रवास करायची. मी ट्रेनच्या दारात उभी राहायची आणि कधी कधी तर मला उडी मारायची इच्छा व्हायची.”

Photo : पेडर रोडवरील प्रभुकुंज निवासस्थानातील ‘या’ घरात राहायच्या लतादीदी

मुंबईसारख्या शहरात एकटे राहणे सोपे नाही, असे म्हणत मृणालला तिला येणाऱ्या या विचारांविषयी सांगितले. “जेव्हा तुम्ही एखादा कोर्स करायंच ठरवतो. तेव्हा तुम्हाला ते बाहेरून खूप चांगल वाटतं, पण जेव्हा तुम्ही त्याची सुरुवात करतात तेव्हा तुम्हाला वाटतं की यासाठी आपण साइन अप केलं नव्हतं. हे काही तरी वेगळच आहे. माझ्यासोबत तेच घडत होतं. मी एक क्रिएटीव्ह व्यक्ती आहे. मला स्क्रिप्ट लिहिता येत नाही. लिट्रेचर नावाचा एक विषय होता. मला वाचायला आवडत नाही, मी चांगली श्रोता आहे, मला गोष्टी बघायला आवडतात.”

Photo : घरात दोनचं खुर्च्या? भारती सिंगचे आलिशान घर पाहिलेत का?

पुढे मृणाल म्हणाली, “तेव्हा मला वाटायंच की, मी कशासाठी साइन अप केले? मला स्वत:विषयी शंका येत होती. मी माझ्या कुटुंबापासून दूर राहत होते. वयाच्या १७-१८व्या वर्षी मुंबईसारख्या शहरात एकटे राहणे सोपे नाही. तुम्हाला तुमचं भाडं आणि जेवणाची काळजी घ्यावी लागते. प्रत्येक रुपयाचा हिशोब द्यावा लागतो आणि माझे वडील बँकर असल्यामुळे मी माझ्या खात्यातून ५०० रुपये काढले तर त्यांना लगेच कळायंच.”

दरम्यान, मृणाल सगळ्यात शेवटी ‘तूफान’ या चित्रपटात दिसली होती. या चित्रपटात की फरहान अख्तरसोबत मुख्य भूमिकेत दिसली. या चित्रपटाचे दिग्दर्शन आणि निर्मिती ही राकेश ओमप्रकाश मेहरा यांनी केलं. तर मृणाल लवकरच ‘जर्सी’ या चित्रपटात शाहिद कपूरसोबत दिसणार आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mrunal thakur talks about times when she would feel jumping off mumbai local train dcp
Show comments