अभिनेत्री मृण्मयी देशपांडे सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. सोशल मीडियावर तिचा बराच मोठा चाहतावर्ग आहे. अनेकदा ती तिचे फोटोशूट आणि फिटनेस व्हिडीओ यासोबतच मजेदार रील्स देखील शेअर करताना दिसते. मृण्मयी आणि तिची बहीण गौतमी यांचे बरेच मजेदार व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. ज्यामुळे ती नेहमीच चर्चेत असते. आताही तिची एक इन्स्टाग्राम पोस्ट व्हायरल होताना दिसत आहे. या पोस्टमधून तिने अभिनेता सिद्धर्थ चांदेकरला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

मृण्मयीने तिच्या इन्स्टाग्रामवर एक बराच जुना फोटो शेअर केला आहे. हा फोटो पाहिल्यावर मृण्मयी आणि सिद्धार्थच्या करिअरच्या अगदी सुरुवातीचा हा फोटो असावा असं वाटतं. हा फोटो शेअर करत हटके अंदाजात मृण्मयीने सिद्धार्थला शुभेच्छा दिल्या आहेत. तिने लिहिलं, “आपण असे दिसत असल्या पासून ते आज पर्यंत…आपण आहोत आणि कायम असणा आहोत… माझ्या लाडक्या मित्रा.. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा… असाच वेडा रहा.. मोठा नको होऊस आणि माझं तुझ्यावर खूप खूप प्रेम आहे.”

आणखी वाचा- 21 Years of Lagaan : शूटिंगच्या वेळी सलग ६ महिने सुरू होता गायत्री मंत्र, अन् आमिर खानने अचानक…

मृण्मयीने शेअर केलेल्या या फोटोमध्ये सिद्धार्थ चांदेकर तिच्याकडे गोंधळलेल्या चेहऱ्याने पाहताना दिसत आहे. तर मृण्मयी त्याला काही सांगत असल्याचे भाव तिच्या चेहऱ्यावर आहेत. या दोघांचा हा फोटो सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत असून अनेकांनी त्यांच्या या लुकवर धम्माल कमेंट केल्या आहे. अभिनेता आदिनाथ कोठारेनं देखील मृण्मयी- सिद्धार्थच्या या फोटोवर कमेंट केली आहे. त्यानं लिहिलं, ‘आणि तो आजही तुझ्याकडे असाच बघतो’ यासोबत त्याने हसणारा इमोजी पोस्ट केला आहे.

आणखी वाचा- Video : स्वतःच्याच रिसेप्शनमध्ये अभिनेत्यावर आली कचरा साफ करण्याची वेळ, व्हिडीओ व्हायरल

दरम्यान मृण्मयीच्या कामाबद्दल बोलायचं तर ती अलिकडेच ‘चंद्रमुखी’ चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती. या चित्रपटात तिनं दौलत देशमाने यांची पत्नी दमयंतीची भूमिका साकारली होती. याशिवाय ‘शेर शिवराज’ चित्रपटातही तिची महत्त्वपूर्ण भूमिका होती. तर सिद्धार्थ चांदेकर अखेरचा ‘झिम्मा’ चित्रपटात दिसला होता.

Story img Loader