मराठमोळी अभिनेत्री मृण्मयी देशापांडेने तिच्या अभिनयाने आणि सौदर्यांनी अनेक प्रेक्षकांनी मनं जिकली आहेत. मराठी मालिका तसंच सिनेमांमधून मृण्मयीने प्रेक्षकांची पसंती मिळवली आहे. मृण्मयीच्या पावलांवर पावलं ठेवतं तिची बहिणी गौतमी देशपांडेने देखील अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. ‘सारे तुझ्याचसाठी’ या मालिकेतून गौतमीने मालिका विश्वात पाऊल ठेवलं. सध्या ‘माझा होशील ना’ या मालिकेतून ती घराघरात पोहचली आहे. मृण्मयीप्रमाणेच गौतमीने देखील चाहत्यांची पसंती मिळवली आहे. मृण्मयी आणि गौतमी दोघी बहिणींमध्ये त्यांच्या नात्यापलीकडची मैत्री पाहायला मिळते. अनेदा दोघी सोशल मीडियावर एकत्रित व्हिडीओ आणि फोटो शेअर करत असतात.
मात्र गौतमीच्या एका करामतीमुळे सध्या मृण्मयी चांगलीच चिडली आहे. नुकताच मृण्मयीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केलाय. यात मृण्मयीने धाकड्या बहिणीचा पर्दाफाश करत तिला थेट चोर म्हंटलं आहे. मृण्मयीने एक व्हिडीओ शेअर केलाय. यात ती म्हणाली, “मी आज एका मोठ्या बहिणीची व्यथा मांडतेय. मी आज गौतमीच्या घरात असून तिचं कपाट लावतेय. मला सांगायला खूप आनंद होतोय की माझे हरवलेले सर्व कपडे मला मिळाले. त्या कपड्यांचे बोळे करून लपवण्यात आले होते. मी तिला विचारलंही होतं की माझे काही टॉप चुकून तुझ्याकडे आले आहेत का? यावर तिने नाही ताई असं सरळ उत्तर दिलं. मात्र त्या कपाटात माझे सगळे कपडे लपवून ठेवण्यात आले होते. ” असं म्हणत मृण्मयीने तिची व्यथा मांडली आहे. तसंच ती गौतमीवर चांगलीच चिडली देखील.
View this post on Instagram
पुढे मृण्मयी म्हणाली, “तुम्ही ज्या सईवर प्रेम करता ती सई चोर आहे.” हा व्हिडीओ शेअर करत मृण्मयी कॅप्शनमध्ये म्हणाली, “अजूनही सुधरली नाहीये ही!!” मृण्मयीच्या या व्हिडीओवर अनेक मराठी कलाकारांनी आणि तिच्या मैत्र-मैत्रिणींनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एवढचं नाही तर गैतमीने देखील प्रतिक्रिया दिली आहे. “खोटारडी तू चोर” असं गौतमी म्हणाली.
बहिणींमधील या गोड भांडणाला चाहत्यांनी चागलीच पसंली दिलीय. मृण्मयीच्या या व्हिडीओला चाहत्यांनी मोठी पसंती दिलीय.