Manoj Tiwari Relation with MS Dhoni: भोजपुरी सिनेसृष्टीत आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणाऱ्या मनोज तिवारी यांनी आजवर अनेक सुपरहिट सिनेमे केले आहेत. नुकतंच ‘पंचायत ३’ मधील त्यांचं ‘हिंद के सितारा’ गाणं खूप गाजलं. चित्रपटांबरोबरच ते राजकारणातही सक्रिय आहेत. ते भाजपाचे खासदार आहेत. अनेक सामाजिक व राजकीय विषयांवर ते आपली मतं मांडत असतात. मनोज तिवारी यांचं भारतीय क्रिकेटपटू एमएस धोनीशी (MS Dhoni) नातं आहे, असं म्हटलं जातं, त्यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मनोज तिवारींनी नुकतीच शुभंकर मिश्राच्या पॉडकास्टमध्ये हजेरी लावली. याठिकाणी त्यांनी सिनेमा, राजकारण आणि वैयक्तिक आयुष्यापर्यंतच्या अनेक गोष्टींबद्दल मनमोकळेपणाने माहिती दिली. या मुलाखतीत तुम्ही एमएस धोनीचे भावोजी आहात असं म्हणतात, यात कितपत तथ्य आहे? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर मनोज प्रतिक्रिया देत म्हणाले, “यात थोडे तथ्य नक्कीच आहे. कारण धोनी आणि माझा मेहुणा अरुण पांडे, दोघेही मित्र होते. एकेकाळी आम्ही दिल्लीत एकत्र राहत होतो. हे दोघेही तिथे सराव करायचे. तेव्हा माझा मेव्हणा आणि धोनी दोघेही मला ‘जीजा’ (भावोजी) म्हणायचे. मी त्याच्या मित्राचा भावोजी आहे पण भारतात मित्रही भावोजीच म्हणतात. त्यामुळे धोनीही मला भावोजी म्हणूनही हाक मारायचा.”

अभिषेक बच्चन सुहाना खान अन् अगस्त्य नंदासह फिरायला पडला बाहेर; कारचे ऐश्वर्या रायशी आहे खास कनेक्शन

मनोज तिवारी यांची पहिली पत्नी कोण होती?

मनोज तिवारी यांनी रानी तिवारीशी १९९९ मध्ये लग्न केले होते. त्यांना जिया नावाची मुलगी आहे. त्यांचे पहिले लग्न १३ वर्षे टिकले आणि नंतर २०१२ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. रानी मुलगी जियासह मुंबईत राहते. मनोज तिवारी पहिली पत्नी व लेकीची भेट घेत असतात. मनोज व रानी यांचा सुखाचा संसार चालू होता, पण ते ‘बिग बॉस’मध्ये गेल्यानंतर त्यांच्या नात्यात दुरावा आला. या शोमध्ये असताना मनोज आणि श्वेता यांच्या जवळीकतेच्या अनेक बातम्या येत होत्या. याच रागातून रानीने १३ वर्षांचा संसार मोडला, असं म्हटलं जातं. ‘बिग बॉस’मध्ये जाण्यापूर्वी मनोज आणि श्वेता तिवारीने अनेक भोजपुरी चित्रपटांमध्ये एकत्र काम केले होते. त्यांची केमिस्ट्री प्रेक्षकांना चांगलीच आवडायची, दोघांच्या नात्याबद्दल खूप चर्चा व्हायची, पण दोघेही या अफवा फेटाळून लावत आपण फक्त मित्र असल्याचं म्हणायचे.

मनोज तिवारी व त्यांच्या पहिल्या पत्नीबरोबर धोनीचा फोटो (सौजन्य सोशल मीडिया)

“माझं कुटुंब उद्ध्वस्त झालंय”, अमिताभ बच्चन यांच्याशी लग्न झाल्यावर जया यांच्या वडिलांनी व्याहींजवळ व्यक्त केलेल्या भावना

मुलीनेच दिला दुसरे लग्न करण्याचा सल्ला

रानीपासून घटस्फोट घेतल्यानंतर मनोज तिवारी एकटे पडले होते. अनेक वर्षे ते एकटेच राहिले. ते चिंतेत राहू लागले होते. अशातच करोना काळात मनोज यांना त्यांची पहिली मुलगी जियाने दुसऱ्या लग्नाचा सल्ला दिला होता. आपल्या मुलीच्या आग्रहास्तव त्यांनी २०२० मध्ये सुरभी तिवारीशी दुसरे लग्न केले. सुरभीपासून त्यांना दोन मुली आहेत. पहिल्या मुलीचे नाव सान्विका असून तिचे नाव जियाने ठेवले आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ms dhoni relation with manoj tiwari ex wife rina tiwari hrc