भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या जीवनावर आधारित ‘एमएस धोनी – दी अनटोल्ड स्टोरी’ चित्रपटाचे निर्माते आज नागपूरमध्ये होणाऱ्या भारत विरुद्ध न्यूझीलंडच्या ‘टी २० वर्ल्ड कप’च्या पहिल्या सामन्याअगोदर चित्रपटाचे टीझर प्रदर्शित करणार आहेत. चित्रपटात धोनीची व्यक्तिरेखा साकारणारा अभिनेता सुशांत सिंग राजपूत नागपूरमध्ये दाखल झाला आहे. ‘इंडिया’ लिहिलेला जर्सी परिधान केलेल्या सुशांतने समाजमाध्यमावर आपले छायाचित्र प्रसिद्ध केले आहे. नेटमध्ये सरावादरम्यान आपण तीन तास नाबाद राहिल्याने आपले गुरू किरण मोरे यांनी त्यांचा हा जर्सी आपल्याला भेट दिल्याचे त्याने छायाचित्रासह लिहिलेल्या संदेशात म्हटले आहे.
‘एमएस धोनी – दी अनटोल्ड स्टोरी’ चित्रपटाच्या पोस्टरने चाहत्यांमध्ये आधीपासूनचं उत्सुकता निर्माण केली आहे. चित्रपटात सुशांत धोनीच्या प्रमुख भूमिकेत असून, किरण अडवाणी साक्षी धोनीची व्यक्तिरेखा साकारताना दिसेल. या वर्षी २ सप्टेंबर रोजी हा चित्रपट प्रदर्शित होईल.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा