भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या जीवनावर आधारित ‘एमएस धोनी – दी अनटोल्ड स्टोरी’ या चित्रपटाचा टिझर काल प्रदर्शित करण्यात आला. या टिझरमध्ये धोनीच्या जीवनप्रवासाची एक छोटीशी झलक पहायला मिळत आहे. धोनीची भूमिका साकारत असलेला सुशांत सिंग टीसीच्या गणवेशात गर्दीतून चालत आहे, या दृश्याने टिझरची सुरूवात होते. रेल्वेतील नोकरीच्या पहिल्याच दिवशी वरिष्ठांच्या सूचना नीट ऐकून घेणाऱ्या धोनीचा आवाजही टिझरमध्ये ऐकायला मिळत आहे. भारतीय संघाने विश्वचषक उंचावल्यानंतर होणाऱ्या धोनीनामाच्या गजरात टिझर संपतो.
चित्रपटाच्या शीर्षकात उल्लेख केल्याप्रमाणे ‘एमएस धोनी- द अनटोल्ड स्टोरी’मध्ये प्रेक्षकांना महेंद्रसिंग धोनीचा वेगळा जीवनप्रवास पहायला मिळणार आहे. या चित्रपटात धोनीची भुमिका उत्तरमरित्या वठवण्यासाठी सुशांतने धोनीचे अनेक व्हिडिओज पाहिले होते. याशिवाय, त्याने माजी क्रिकेटपटू किरण मोरे यांच्या मार्गदशनाखाली क्रिकेटचे धडेही गिरवले होते. ‘अवेनस्डे’ आणि ‘स्पेशल २६’ या चित्रपटांचा दिग्दर्शक नीरज पांडे याने ‘एमएस धोनी- द अनटोल्ड स्टोरी’चे दिग्दर्शन केले आहे. या वर्षी २ सप्टेंबर रोजी हा चित्रपट प्रदर्शित होईल.
पाहा: ‘एमएस धोनी – दी अनटोल्ड स्टोरी’चा टिझर
या टिझरमध्ये धोनीच्या जीवनप्रवासाची एक छोटीशी झलक पहायला मिळत आहे
Written by लोकसत्ता टीम
आणखी वाचा
First published on: 16-03-2016 at 11:27 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ms dhoni the untold story teaser sushant singh rajput rocks as railway tc in the biopic