‘डेरा सच्चा सौदा’चे प्रमुख गुरमीत राम रहिम सिंग यांच्या ‘एमएसजी – दी मेसेंजर ऑफ गॉड’ या आगामी चित्रपटाच्या ध्वनिफितीचे मंगळवारी पीव्हीआर प्रिया चित्रपटगृहात अनावरण करण्यात आले. ‘डेरा सच्चा सौदा’चे प्रमुख गुरमीत राम रहिम सिंग यांनी दिग्दर्शक, अभिनेता, लेखक आणि संगीतकाराची भूमिका बजावली आहे. या ध्वनिचित्रफितीच्या अनावरण सोहळ्यास राम रहिम सिंग, सह-कलाकार फ्लोरा सैनी आणि बॉक्सर विजेंद्र सिंग उपस्थित होते. ‘नेव्हर एव्हर’, ‘राम राम’, ‘रतन-बतन’, ‘दारू को गोली मारो’, ‘पापा दी ग्रेट’ इत्यादी गाण्यांचा समावेश असलेल्या या अल्बमने ‘फ्लिपकार्ट’ आणि ‘अॅमेझॉन’च्या ऑनलाईन विक्रीच्या प्री-बुकिंगचे रेकॉर्ड मोडीत काढले आहेत. यावेळी बोलताना चित्रपटाच्या अल्बमने अनावरणाच्या दिवशी रेकॉर्ड मोडीत काढणे ही परमेश्वराची कृपा असल्याचे सांगत सोनी म्युझिकने या अल्बमसाठी कठोर परिश्रम घेतले असून, मी त्यांचे अभिनंदन करत असल्याचे राम रहिम यांनी हे सर्व शक्य करणाऱ्या भाग्यविधात्याला सादर प्रणाम अर्पण केला. जानेवारीच्या १६ तारखेला प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटात राम रहिम प्रमुख गुरुच्या भूमिकेत दिसणार असून, फ्लोरा सैनी आणि जयश्री सोनी यांच्यादेखील या चित्रपटात भूमिका आहेत. हरियाणाच्या सिरसा येथे वसलेल्या ‘डेरा सच्चा सौदा’चे राज्यात ६० लाख भक्तगण आहेत.
‘एमएसजी – दी मेसेंजर ऑफ गॉड’ चित्रपटाच्या ध्वनिफीतीचे अनावरण
'डेरा सच्चा सौदा'चे प्रमुख गुरमीत राम रहिम सिंग यांच्या 'एमएसजी - दी मेसेंजर ऑफ गॉड' या आगामी चित्रपटाच्या ध्वनिफितीचे मंगळवारी पीव्हीआर प्रिया चित्रपटगृहात अनावरण करण्यात आले.
First published on: 07-01-2015 at 05:09 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Msg the messenger of gods music album launched