भारताचे मोठे उद्योगपती मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. एन्कोर हेल्थकेअर प्रायव्हेट लिमिटेडचे ​​सीईओ वीरेन मर्चंट आणि उद्योजिक शैला मर्चंट यांची लेक राधिका मर्चंट हिच्याशी अनंत अंबानी लग्नगाठ बांधणार आहे. काही महिन्यांपूर्वीच अनंत-राधिकाचा प्री-सोहळा मोठ्या धुमधडाक्यात गुजरातमधील जामनगर येथे पार पडला. १ मार्च ते ३ मार्चपर्यंत तीन दिवसांच्या या प्री-वेडिंग सोहळ्याला सेलिब्रिटींसह उद्योग जगतातील दिग्गज मंडळींनी उपस्थिती लावली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा दुसऱ्यांदा अनंत-राधिकाचा प्री-वेडिंग सोहळा होणार असल्याचं वृत्त आलं आहे. एवढंच नाहीतर प्री-वेडिंगची तारीख, ठिकाण, पाहुण्यांची यादी समोर आली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अनंत-राधिकाच्या पहिल्या प्री-वेडिंग सोहळ्याच्या पहिल्या दिवशी, १ मार्चला जगप्रसिद्ध पॉप स्टार रिहानाचा परफॉर्मन्स झाला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी संगीत सोहळा झाला. यामध्ये बॉलीवूडच्या सेलिब्रिटींनी जबरदस्त परफॉर्मन्स केला. बॉलीवूडचे तीन खान ‘नाटू नाटू’ या गाण्यावर डान्स करताना दिसले. तिसऱ्या दिवशी, ३ मार्चला ‘टस्कर ट्रेल्स’ आणि ‘हस्ताक्षर’ कार्यक्रम झाला. ‘टस्कर ट्रेल्स’ हा आउटडोअर कार्यक्रम होता. ज्याद्वारे पाहुण्यांना जामनगर, वनतारा फिरवलं. त्यानंतर रात्री भव्य महाआरती आणि अनंत-राधिका यांची हस्ताक्षर सेरेमनी पार पडली. या सोहळ्याला १२०० पाहुण्यांनी उपस्थितीत लावली होती. आता दुसरा प्री-वेडिंग सोहळा आयोजित करण्यात आला आहे.

हेही वाचा – “म्हारी छोरियां छोरों से कम हैं के…”, पुतणी १२ वी पास झाल्यावर संतोष जुवेकरची पोस्ट, म्हणाला…

‘हिंदुस्थान टाइम्स’च्या वृत्तानुसार, अनंत-राधिका यांचा दुसरा प्री-वेडिंग सोहळ्याचे आयोजन २८ मे ते ३० मे पर्यंत करण्यात आलं आहे. हा प्री-वेडिंग सोहळा लक्झरी क्रूझवर असून जवळपास ८०० पाहुण्यांना आमंत्रित केलं आहे. ही लक्झरी क्रूझ तीन दिवसांत ४३८० किलो अंतर कापून इटलीपासून दक्षिण फ्रान्सपर्यंत जाईल.

अनंत-राधिकाच्या दुसऱ्या प्री-वेडिंगमधील पाहुण्यांच्या यादीत अभिनेता सलमान खान, शाहरुख खान, आमिर खान, रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांची नावं सामिल आहेत. ८०० पाहुण्यांव्यतिरिक्त ६०० कर्मचारी देखभालीसाठी क्रूझवर उपस्थित असणार आहेत.

हेही वाचा – ‘तुजवीण सख्या रे’नंतर गौरव घाटणेकर ‘या’ नव्या मालिकेत झळकणार प्रमुख भूमिकेत, पत्नीची आहे निर्मिती

दरम्यान, अनंत अंबानी व राधिका मर्चंट यांचं जुलै महिन्यात मोठ्या थाटामाटात लग्न होणार आहे. काही दिवसांपूर्वी हे लग्न लंडनमध्ये होणार असल्याचं वृत्त आलं होतं. गेल्या वर्षी १९ जानेवारीला दोघांचा मुंबईत साखरपुडा झाला होता.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mukesh ambani and nita ambani are set to host a second pre wedding bash for anant ambani and radhika merchant pps