Anant Ambani and Radhika Merchant Wedding: मुकेश व नीता अंबानीचा धाकटा मुलगा अनंत अंबानीचा आज, १२ जुलैला शाही लग्नसोहळा पार पडणार आहे. राधिका मर्चंट हिच्याशी लग्नगाठ बांधून अनंत अंबानी आयुष्याच्या नव्या वाटेवर पाऊल ठेवणार आहे. गेल्या काही महिन्यांपासून लग्नाआधीचे कार्यक्रम जोरदार सुरू होते. अखेर आज दोघं लग्नबंधनात अडकणार आहेत. त्यामुळे सध्या सगळ्यांचं लक्ष अनंत-राधिकाच्या लग्नाकडे लागलं आहे. अशातच सोशल मीडियावर रिलायन्स व जिओच्या कर्मचाऱ्यांनी अंबानींकडून मुलाच्या लग्नानिमित्ताने मिळालेल्या भेटवस्तूचे व्हिडीओ शेअर केले आहेत; जे सध्या चांगलेच चर्चेत आले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अनंत-राधिकाच्या लग्नाआधी दोन प्री-वेडिंग सोहळे पार पडले. गुजरात येथील जामनगरमध्ये दोघांचा पहिला प्री-वेडिंग सोहळा झाला. त्यानंतर दुसरा प्री-वेडिंग सोहळा इटली-फ्रान्स असा प्रवास करत क्रूझवर पार पडला होता. त्यानंतर जुलै महिना सुरू होताच बरेच कार्यक्रम आणि समारंभ पाहायला मिळाले. २ जुलैला सामूहिक विवाह सोहळ्यानंतर मामेरू समारंभ, गरबा नाईट, संगीत सोहळा, ग्रह शांती पूजा, शिव शक्ती पूजा आयोजित करण्यात आली होती. या सर्व समारंभ आणि पूजेनंतर आज अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट लग्नबंधनात अडकणार आहेत. अवघे काही तास दोघांच्या लग्नासाठी बाकी आहेत. मुकेश व नीता अंबानींनी आपल्या लाडक्या मुलाच्या लग्नानिमित्ताने रिलायन्स व जिओच्या कर्मचाऱ्यांना खास भेटवस्तू दिली आहे.

हेही वाचा – Anant Ambani Wedding: आकर्षक विद्युत रोषणाईने सजला अनंत-राधिकाचा लग्नमंडप, व्हिडीओ आला समोर

तान्या राज आणि फिरदौस मोहम्मद इरफान अन्सारी यांनी मुकेश व नीता अंबानींकडून मिळालेल्या भेटवस्तूचा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडीओत, अंबानींकडून कर्मचाऱ्यांना एक मोठा असा बॉक्स मिळाल्याचं दिसत आहे. ज्यामध्ये चांदीचं नाणं, मिठाई, शेव, चिवड्याचं पाकिटं पाहायला मिळत आहे. तसंच चांदीच्या नाण्यावर अनंत-राधिकाच्या नावाचं पहिलं अक्षर ‘अR’ असं लिहिण्यात आलं आहे. त्यामुळे सध्या रिलायन्स व जिओच्या कर्मचाऱ्यांकडून अंबानींचे आभार व्यक्त केले जात आहेत.

हेही वाचा – Anant Ambani Wedding Live Updates: अनंत-राधिकाच्या लग्नस्थळी लोकांची गर्दी, पाहा जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरचा Video

हेही वाचा – Video: हर हर महादेव…; अनंत-राधिकाच्या लग्नाआधी अँटिलियावर ‘अशी’ पार पडली शिव शक्ती पूजा, Unseen Video आला समोर

दरम्यान, माहितीनुसार, अनंत-राधिकाचं लग्न आज दुपारी ३ वाजता शुभ मुहूर्तावर होणार आहे. त्यानंतर १३ जुलैला संध्याकाळी आशीर्वाद समारंभ होणार आहे. या समारंभाला मोजके पाहुणे उपस्थित राहणार आहेत. १४ जुलैला रिसेप्शन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्याला मीडिया आणि फिल्म इंडस्ट्रीतील लोकांना आमंत्रित करण्यात आलं आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mukesh ambani and nita ambani gave gift box to reliance and jio employees for anant ambani wedding pps