प्रसिद्ध व्यावसायिक व उद्योगपती मुकेश अंबानी व नीता अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानीचा गेल्याच महिन्यात साखरपुडा पार पडला. अनंत अंबानी व राधिका मर्चंटच्या साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. आता लवकरच अनंत व राधिका विवाहबंधनात अडकणार आहेत. अंबानी कुटुंबाची होणारी धाकटी सून राधिकाच्या एका व्हिडीओने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
राधिका मर्चंटने नुकतंच फॅशन डिझायनर अबू जानी आणि संदीप खोसला यांनी आयोजित केलेल्या एका पार्टीला हजेरी लावली. ‘मेरा नूर है मशहूर’ या फॅशन चित्रपटाच्या प्रिमिअरनिमित्ताने ही पार्टी आयोजित करण्यात आली होती. या पार्टीला नीतू कपूर, श्वेता बच्चन, जया बच्चन यांच्यासह अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी उपस्थित होते. परंतु, या सगळ्यात राधिका मर्चंटने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. पार्टीसाठी राधिकाने फिकट भगव्या रंगाची साडी नेसली होती. यावर तिने डिझायनर ब्लाऊज परिधान केला होता. मॅचिंग ज्वेलरी आणि साजेसा मेकअपमध्ये राधिकाचं सौंदर्य खुलून आलं होतं. राधिकाच्या साधेपणाची झलक या पार्टीत पाहायला मिळाली.
हेही वाचा>> आजारी आईला भेटायला गेलेला नवाजुद्दीन सिद्दीकी, सख्ख्या भावाने बाहेरचा रस्ता दाखवला अन्…; व्हिडीओ व्हायरल
राधिका मर्चंटचा पार्टीतील व्हिडीओ विरल भय्यानी या पापाराझी अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. अंबानींच्या होणाऱ्या सुनेच्या साधेपणाचं नेटकऱ्यांनी कौतुक केलं आहे. या व्हिडीओवर कमेंट करत “किती साधी आणि सुंदर” असं म्हटलं आहे. तर एकाने “किती सुंदर दिसत आहे” अशी कमेंट केली आहे. “सुंदर व क्लासी” असंही एकाने कमेंटमध्ये म्हटलं आहे. राधिका व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
राधिका ही एनकोर हेल्थकेअरचे सीईओ बिरेन मर्चंट आणि शैला मर्चंट यांची मुलगी आहे. गुरु भावना ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली तिने श्री निवा आर्ट्समधून भरतनाट्यमचं प्रशिक्षण घेतलं आहे. राधिका व अनंत अंबानी लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत.