उद्योगपती व व्यावसायिक मुकेश अंबानी व नीता अंबानी यांच्या घरी लगीनघाई सुरू आहे. मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी ह्याच्या लग्नापूर्वीच्या कार्यक्रमांना सुरुवात झाली आहे. अनंत अंबानीचा विवाह राधिका मर्चंट हिच्याशी होणार आहे. नुकतंच त्यांचा मेहेंदी सोहळा पार पडला. त्यांच्या मेहेंदी कार्यक्रमातील फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
राधिका मर्चंटने मेहेंदीसाठी खास गुलाबी रंगाचा डिझायनर लेहेंगा परिधान केला होता. खड्यांच्या ज्वेलरीमध्ये अंबानींच्या धाकट्या सुनेचं सौंदर्य खुलून आलं होतं. राधिका एक उत्तम नृत्यांगणा असून तिने भरतनाट्यमचं शिक्षण घेतलेलं आहे. मेहेंदी सोहळ्यातही राधिकाने तिच्या नृत्याने चार चांद लावले. एका फॅन पेजवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.
हेही वाचा>> राखी सावंतच्या मदतीला मुकेश अंबानी आले धावून, अभिनेत्री आभार मानत म्हणाली…
हेही वाचा>> “…म्हणून मी चांगली आई झाले”, जिनिलीया देशमुखने मुलांबाबत केलेलं वक्तव्य चर्चेत
नीता मुकेश अंबानी या इन्स्टाग्राम पेजवरुन शेअर करण्यात आलेल्या व्हिडीओमध्ये राधिका ‘घर मोहे परदेसिया’ या बॉलिवूड गाण्यावर थिरकताना दिसत आहे. अनंत अंबानी व राधिका मर्चंटच्या मेहेंदी सोहळ्यातील हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
अनंत अंबानी व राधिका मर्चंट लवकरच विवाहबंधनात अडकणार आहेत. गेल्याच महिन्यात त्यांचा साखरपुडा पार पडला. राधिका ही एनकोर हेल्थकेअरचे सीईओ बिरेन मर्चंट व शैला मर्चंट यांची मुलगी आहे. अनंत अंबानी व राधिका गेल्या अनेक वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते. आता विवाहबंधनात अडकून ते नवीन आयुष्याला सुरुवात करणार आहेत.