Anant Ambani-Radhika Merchant Wedding: उद्योगपती मुकेश अंबानी व नीता अंबानी यांचा छोटा मुलगा अनंत अंबानीचं लग्न अवघ्या काही दिवसांवर बाकी आहे. १२ जुलैला अनंत अंबानी राधिका मर्चंट हिच्याशी लग्नगाठ बांधणार आहे. त्यामुळे सध्या अनंत-राधिकाच्या लग्नाची जोरदार तयारी असल्याचं पाहायला मिळत आहे. अशातच मुकेश व नीता अंबानींनी लेकाच्या लग्नाआधी ५० गरीब जोडप्यांची लग्नगाठ बांधली. याचे व्हिडीओ सध्या व्हायरल झाले आहेत.
अनंत अंबानी व राधिका मर्चंट यांच्या प्री-वेडिंग सेलिब्रेशनमध्येच अंबानींनी या सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन केलं होतं. आज सायंकाळी ४.३० वाजता पालघर येथील स्वामी विवेकानंद विद्यामंदिर येथे हा सामूहिक विवाह सोहळा पार पडला. या सामूहिक विवाह सोहळ्याला स्वतः मुकेश अंबानी, नीता अंबानी, आकाश अंबानी, श्लोका अंबानी, ईशा अंबानी, आनंद पिरामल उपस्थित होते. मोठ्या थाटामाटात आणि पारंपरिक पद्धतीने अंबानींनी ५० गरीब जोडप्याचं लग्न करून दिलं.
यावेळी जोडप्यांना सोन्या-चांदीचे दागिने देखील देण्यात आले. मंगळसूत्र, कानातले, अंगठी असे सर्व काही दागिने गरीब जोडप्यांना अंबानी कुटुंबीतील सदस्यांच्या हस्ते दिलं. याशिवाय आहेर देऊन अंबानी कुटुंबाने सर्व जोडप्यांना आशीर्वाद दिला. विशेष म्हणजे सामूहिक विवाह सोहळ्यात मराठी लग्नाची गाणी लावण्यात आली होती. पालघर येथे पार पडलेल्या सामूहिक विवाह सोहळ्यातील सध्या अनेक व्हिडीओ समोर आले आहेत.
या व्हिडीओमध्ये अंबानी कुटुंबातील सदस्य नवविवाहित जोडप्यांना आशीर्वाद देताना दिसत आहेत. या सामूहिक विवाह सोहळ्यासाठी नीता अंबानींनी खास लाल रंगाची साडी नेसली होती. नेहमीप्रमाणे त्या लाल रंगाच्या साडीत खूप सुंदर दिसत होत्या. तसंच मुकेश अंबानी पांढऱ्या रंगाच शर्ट व काळ्या रंगाची पँट अशा साध्या वेशात पाहायला मिळाले.
दरम्यान, १२ जुलैला अनंत अंबानी व राधिका मर्चंट यांचं हिंदू पद्धतीनं लग्न होणार आहे. त्यानंतर १३ जुलैला शुभ आशीर्वादाचा कार्यक्रम होणार असून १४ जुलैला मोठा रिसेप्शन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या लग्नसोहळ्यात बॉलीवूड सेलिब्रिटींसह दिग्गज मंडळी उपस्थित राहणार आहेत.