मुकेश अंबानी यांच्या कुटुंबात सध्या आनंदाचे वातावरण आहे. मुकेश आणि नीता अंबानी यांचा मोठा मुलगा आकाश अंबानी आणि त्यांची पत्नी श्लोका मेहता दुसऱ्यांदा आई-वडील झाले. आकाश अंबानी श्लोका मेहताला कन्यारत्न झाले आहे. अंबानी कुटुंबाने आपल्या नवजात नातीचे जोरदार स्वागत केले दरम्यान मुकेश अंबानी यांचा एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओत मुकेश अंबानी श्लोका अंबानीची मुलगी आणि आपली नात ‘आदिया’शी खेळताना दिसत आहेत.
आकाश अंबानी आणि श्लोका मेहता यांच्या लहान मुलीच्या स्वागताचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये अंबानी कुटुंबातील तीन पिढ्याही एकत्र दिसल्या होत्या. व्हिडिओमध्ये मुकेश अंबानी, त्यांची मुलगी ईशा अंबानी आणि त्यांची नात आदिया एकाच फ्रेममध्ये दिसत होते. या व्हिडिओमध्ये आजोबा मुकेश अंबानी आपल्या नातीचे लाड करताना दिसत आहेत.
आकाश अंबानी याचा मोठा मुलगा पृथ्वी आणि मुकेश अंबानी त्यांचा नातू पृथ्वीमध्ये एक वेगळं नात आहे. आजोबा आणि नातवाची ही जोडी अनेक ठिकाणी आपल्याला पाहयला मिळते. नुकतेच मुकेश अंबानी पृथ्वी अंबानीबरोबर सिद्धिविनायकाचे दर्शन घेतलं होतं. यावेळी पृथ्वी मुकेश अंबानीच्या मांडीत बसलेला दिसून आला होता.