प्रियदर्शिनी अकादमीतर्फे दिला जाणारा प्रतिष्ठेचा ग्लोबल अॅवॉर्ड यंदा प्रसिद्ध नेते दादा वासवानी, रिलायन्स समूहाचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी, राजश्री बिर्ला, प्राध्यापक जेफ्री साच, अभिनेत्री प्रियांका चोप्रा यांना जाहीर झाला आहे. पुरस्कारांचे हे तिसावे वर्ष असून १९ सप्टेंबरला ट्रायडंट हॉटेल येथे हा पुरस्कार सोहळा रंगणार आहे.
नानिक रूपानी यांनी १९८४ मध्ये प्रियदर्शिनी अकादमीची स्थापना केली होती. या अकादमीची धुरा आता निरंजन हिरानंदानी यांच्याकडे देण्यात आली आहे. यावर्षी दादा वासवानी, मुकेश अंबानी, राजश्री बिर्ला, प्रियांका चोप्रा, जेफ्री साच, ज्युलिया मोरले, सर फझल हसन यांना या पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे. या सोहळ्याला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील, उर्जा राज्यमंत्री पियूष गोयल उपस्थित राहणार आहेत.
मुकेश अंबानी, प्रियांका चोप्रा यांना ‘प्रियदर्शिनी अकादमी ग्लोबल अॅवॉर्ड’
प्रियदर्शिनी अकादमीतर्फे दिला जाणारा प्रतिष्ठेचा ग्लोबल अॅवॉर्ड यंदा प्रसिद्ध नेते दादा वासवानी, रिलायन्स समूहाचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी, राजश्री बिर्ला, प्राध्यापक जेफ्री साच, अभिनेत्री प्रियांका चोप्रा यांना जाहीर झाला आहे.
First published on: 19-09-2014 at 12:56 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mukesh ambani priyanka chopra get priyadarshni awards