अनंत अंबानी व राधिका मर्चेंट यांच्या प्री-वेडिंग सोहळ्याला कालच जामनगरमध्ये सुरुवात झाली आहे. या कार्यक्रमासाठी जगभरातील प्रसिद्ध मंडळींनी हजेरी लावली आहे. ग्लोबल फेम गायिका रिहानादेखील अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या प्री-वेडिंग फंक्शनसाठी भारतात दाखल झाली आहे. एकूणच भारतातील हा अतिशय मोठा आणि शाही थाट असलेला लग्नसोहळा सध्या चांगलाच चर्चेत आहे. यामुळे संपूर्ण अंबानी परिवार चर्चेत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या प्री-वेडिंग इव्हेंटमध्ये बऱ्याच आंतरराष्ट्रीय तसेच बॉलिवूड सेलिब्रिटीजनी हजेरी लावली. या शाही सोहळ्यासाठी अंबानी परिवाराने खर्च केलेली रक्कम ऐकून तुमच्या पायाखालची जमीनच सरकेल. ‘मेन्स एक्सपी’च्या रिपोर्टनुसार अंबानी यांनी या इव्हेंटसाठी तब्बल १००० कोटींचा खर्च केल्याचं स्पष्ट झालं आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे आपल्या लहान मुलाच्या लग्नासाठी मुकेश अंबानी आणि नीता अंबानी हे दाम्पत्य जी रक्कम खर्च करत आहेत ती त्यांच्या एकूण संपत्तीच्या केवळ ०.१% इतकीच आहे.

आणखी वाचा : टीना मुनीम व अनिल अंबानी यांच्या लग्नाला घरून होता विरोध; ‘या’ कारणामुळे धीरूभाई अंबानी होते नाराज

मीडिया रिपोर्टनुसार अनंत आणि राधिका यांच्या लग्नात २१ ते ६५ आचारी यांना जेवण बनवण्यासाठी पाचारण करण्यात आलं आहे. पाच प्रकारच्या ब्रेकफास्टसह एकूण २५०० वेगवेगळे पदार्थ हे आचारी बनवणार आहेत. सेलिब्रिटीजपासून मीडियापर्यंत सगळ्यांसाठी अंबानी यांनी अत्यंत जबरदस्त अशी सोय केलेली आहे. एकूणच अंबानी कुटुंबाने या लग्नासाठी पाण्यासारखा पैसा खर्च केला असल्याचं स्पष्ट झालं आहे.

हॉलिवूड स्टार्ससाठीसुद्धा जामनगरमध्ये विशेष सोय करण्यात आली असून या इव्हेंटमध्ये परफॉर्म करणाऱ्या आंतरराष्ट्रीय कलाकारांनीही तगडे मानधन घेतल्याचं समोर आलं आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, रिहानाने अंबानी कुटुंबाच्या या सेलिब्रेशनचा एक भाग होण्यासाठी करोडोंमध्ये फी आकारली आहे. MailOnline च्या मते, ग्रॅमी विजेत्या या गायिकेला अंबानी कुटुंबियांनी या कार्यक्रमासाठी US$5 दशलक्ष म्हणजे अंदाजे ४१.४ कोटी रुपये दिले आहेत. रिहाना व्यतिरिक्त, अमेरिकन गायक आ जे ब्राउन आणि मल्टी-इंस्ट्रुमेंटलिस्ट, गीतकार, निर्माता आणि बासवादक ॲडम ब्लॅकस्टोन यांनीही या सोहळ्याला हजेरी लावली होती.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mukesh ambani spends only 0 1 percent of his net worth for anant ambani and radhika merchant pre wedding event avn