मुकेश अंबानी हे जगातील श्रीमंत उद्योजकांपैकी एक आहेत. संपूर्ण अंबानी कुटुंब नेहमीच विविध कारणांनी चर्चेत असतं. मुकेश व नीता अंबानी असो किंवा त्यांची मुलं असोत; ते नेहमीच देवाच्या चरणी नतमस्तक होताना दिसतात. आज मुकेश अंबानी यांनी त्यांचा मुलगा, सून व नातवासह सिद्धिविनायकाचं दर्शन घेतलं आहे.

मुकेश अंबानी त्यांचा मुलगा आकाश अंबानी, सून श्लोका अंबानी व त्यांचा नातू पृथ्वी अंबानी यांच्याबरोबर आज दुपारी सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठी आले होते. या वेळेचा त्यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. सिद्धिविनायकाच्या दर्शनाला जाताना त्यांच्या साधेपणाने सर्वांचंच लक्ष वेधलं आहे.

two sons of a mother joined the army together
मायबापाच्या कष्टाचं फळ! दोन्ही मुले एकाच वेळी रूजू झाले भारतीय सैन्यात, VIDEO होतोय व्हायरल
walmik karad illegal transportation
वाल्मीक कराड: राखेच्या अवैध वाहतुकीतून दहशतीचा धुरळा!
youth dies by suicide
प्रेयसीशी व्हिडीओ कॉलवर बोलत असताना तरुणानं केली आत्महत्या
Tejashri Pradhan
तेजश्री प्रधानचा सिच्युएशनशिप, बेंचिंगबाबत तरुण पिढीला सल्ला; म्हणाली, “ज्या क्षणाला तुम्ही तुमचा आत्मसन्मान…”
Somnath Suryawanshi Mother
Somnath Suryawanshi Mother : राहुल गांधींच्या भेटीनंतर सोमनाथ सूर्यवंशीच्या आईचा साश्रू नयनांनी दावा, “माझ्या मुलाला मारहाण करुन त्याचे…”
chota dadiyal tiger latest news in marathi
Video : ताडोबातील ‘‘अजीम-ओ-शान शहंशाह” कोण..?
Tanvi Mundle
“तो असता तर आयुष्य…”, ‘भाग्य दिले तू मला’ फेम अभिनेत्री वडिलांबद्दल झाली व्यक्त, म्हणाली…
Manohar Sapre from Chandrapur Marathi cartoonist
चंद्रपूरचे मनोहर सप्रे

आणखी वाचा : रिसेप्शन सिद्धार्थ-कियाराचं पण चर्चा आकाश व श्लोका अंबानीच्या नम्रपणाची, व्हायरल व्हिडीओवर होतोय कौतुकाचा वर्षाव

मुकेश अंबानी व आकाश अंबानी यांनी सिद्धिविनायकाच्या दर्शनाला जाताना पांढऱ्या रंगाचा झब्बा परिधान केला होता. तर आकाश अंबानीची पत्नी श्लोका अंबानी हिने पांढऱ्या रंगाचा साधा ड्रेस व त्यावर गुलाबी रंगाची ओढणी परिधान केली होती. या वेळी मुकेश अंबानी त्यांच्या नातवाला कडेवर घेऊन चालताना दिसले.

हेही वाचा : थाटात संपन्न झाला मुकेश व नीता अंबानींच्या सुनेच्या डोहाळेजेवणाचा कार्यक्रम, श्लोका अंबानीच्या लूकने वेधलं लक्ष

आता त्यांचा हा व्हिडीओ चांगलाच चर्चेत आला आहे. सिद्धिविनायकाच्या दर्शनाला जातानाचा त्यांचा साधेपणा नेटकऱ्यांना चांगलाच भावला आहे. या व्हिडीओवर कमेंट करत एका नेटकऱ्याने लिहिलं, “अंबानी किती साधे राहतात. आपल्या नातवाला कडेवर घेऊन ते देवळात जात आहेत.” तर आणखी एक नेटकरी म्हणाला, “खरोखर… खूपच नम्र.” तर आणखी एका नेटकऱ्याने लिहिलं, “खूप कौतुकास्पद आहे… ते त्यांच्या नातवावर खूप चांगले संस्कार करत आहेत.”

Story img Loader