Mukesh Ambani with Pakistani politician Sharmila Faruqui : भारतातील सर्वात श्रीमंत उद्योगपती आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी धाकट्या मुलाचे लग्न झाल्यानंतर कुटुंबासह पॅरिसच्या दौऱ्यावर आहेत. मुकेश अंबानी त्यांची मुलगी ईशा अंबानी व नातवांना घेऊन पॅरिसमधील डिस्नेलँडला पोहोचले. डिस्नेलँडमध्ये मुकेश अंबानी यांच्याबरोबर एका महिलेचा तिच्या कुटुंबाबरोबरचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

पॅरिसमध्ये मुकेश अंबानी यांच्याबरोबर जी महिला दिसतेय ती पाकिस्तानी राजकारणी शर्मिला फारुकी आहे. मुकेश अंबानींनी शर्मिला व त्यांच्या कुटुंबाबरोबर फोटो काढले. शर्मिला फारुकी या पाकिस्तान पीपल्स पार्टीच्या नेत्या आहेत. वॉल स्ट्रीटचे माजी बँकर हशाम रियाझ शेख यांच्याशी त्यांचं लग्न झालं आहे आणि या जोडप्याला एक मुलगा आहे. पती-पत्नी दोघांनीही डिस्नेलँड पॅरिसमधील मुकेश अंबानींबरोबरचे फोटो शेअर केले आहेत.

“जेव्हा मला समजलं की…”, मूल नसण्याबाबत शबाना आझमींनी केलेलं वक्तव्य; बाळ दत्तक घेण्याबद्दल म्हणालेल्या…

“मुकेश अंबानी यांच्याबरोबर,” असं कॅप्शन देत हशाम रियाझ यांनी फोटो शेअर केला आहे. फोटोमध्ये शर्मिला व हशाम आपल्या मुलाबरोबर आहेत, तर मुकेश अंबानी आपल्या लाडक्या नातीबरोबर दिसत आहेत. त्यांच्या या फोटोवर नेटकरी कमेंट्स करत आहेत.

“माझं कुटुंब उद्ध्वस्त झालंय”, अमिताभ बच्चन यांच्याशी लग्न झाल्यावर जया यांच्या वडिलांनी व्याहींजवळ व्यक्त केलेल्या भावना

दरम्यान, मुंबईत अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा विवाहसोहळा आटोपल्यानंतर अंबानी कुटुंबातील इतर सदस्यही पॅरिसमध्ये आहेत. मुकेश अंबानी यांच्या पत्नी आणि रिलायन्स फाऊंडेशनच्या अध्यक्षा नीता अंबानी पॅरिस ऑलिम्पिकसाठी पॅरिसमध्ये आहेत. भारताकडून आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या सदस्य म्हणून त्यांची एकमताने पुन्हा निवड झाली आहे.

अमिताभ, जया व रेखा लाँग ड्राइव्हवर जायचे एकत्र; ‘ते’ दोघेही पुढच्या सीटवर बसायचे अन् मागे…

अनंत राधिका यांचे लग्न

जामनगर, इटली याठिकाणी प्री-वेडिंगनंतर अनंत व राधिका यांचे मुंबईत १२ जुलै रोजी लग्न झाले. लग्नानंतर शुभ आशीर्वाद सोहळा व १४ जुलैला रिसेप्शन पार पडले. या लग्नाला तसेच रिसेप्शनला फक्त भारतातील नाही तर जगभरातील पाहुणे उपस्थित होते.

Anant Ambani Radhika Merchant wedding
अनंत अंबानी व राधिका मर्चंट

लग्नानंतर अनंत राधिका जामनगरला गेले, तिथे त्यांचं भव्य स्वागत झाला. आता अंबानी कुटुंबीय अनंत आणि राधिका यांच्या लंडनमधील स्टोक पार्क येथील घरी लग्नाची पार्टी देणार असल्याची चर्चा आहे.

Story img Loader