सध्या सगळीकडेच प्रसिद्ध उद्योजिका नीता अंबानी यांच्या ‘नीता मुकेश अंबानी सांस्कृतिक केंद्र’च्या उद्घाटन सोहळ्याची जोरदार चर्चा सुरू आहे. या सोहळ्याला अनेक दिग्गज मंडळींनी हजेरी लावली होती. कार्यक्रमाची भव्यदिव्यता पाहता अवाढव्य खर्च करण्यात आला असल्याचं चित्र पाहायला मिळालं. शिवाय अनेक बॉलिवूड कलाकारांनीही या सोहळ्याला उपस्थिती दर्शवली होती. दरम्यान यावेळी संपूर्ण अंबानी कुटुंबही उपस्थित होतं.

यावेळी मुकेश अंबानी व नीता अंबानींची मुलगी ईशा अंबानीने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. काही महिन्यांपूर्वीच ईशाने जुळ्या मुलांना जन्म दिला. मायदेशी परतल्यानंतर ईशा बऱ्याचदा कॅमेऱ्यामध्ये कैद झाली. आता तिच्या साधेपणाचं सोशल मीडियावर कौतुक होताना दिसत आहे. ईशाने तिच्या वागणूकीमधून सगळ्यांची मनं जिंकली आहेत.

Aishwarya Narkar
Video: “शेवटचे एकदा…”, ऐश्वर्या नारकर यांनी कोणासाठी शेअर केली पोस्ट?
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Vinod Kambli Emotional Statement on Sachin Tendulkar Said He Paid for My Surgeries
VIDEO: “सचिनने माझ्या शस्त्रक्रियेचा सगळा खर्च केला…”; विनोद कांबळीने भावुक होत सांगितला घटनाक्रम
myra vaikul baby brother naming ceremony
Video : मायरा वायकुळच्या लहान भावाच्या बारशाचा राजेशाही थाट! नाव ठेवलंय खूपच खास, अर्थही सांगितला
Lakhat Ek Aamcha Dada
Video: “मी आता तुळजा सूर्यकांत जगताप…”, बाप-लेक समोरासमोर येणार; तुळजा डॅडींना सणसणीत उत्तर देणार, पाहा प्रोमो
sridevi akshay kumar
“अक्षय कुमारवर श्रीदेवी चिडल्या होत्या…”, प्रसिद्ध दिग्दर्शकाने सांगितला किस्सा; म्हणाला, “तो घाबरायचा…”
Punha Kartvya Aahe
Video: “हिला अन्न-पाणी…”, आईच्या विरोधात जाऊन आकाश वसुंधराची साथ देणार; नेटकरी म्हणाले, “नवरा-बायकोमधील नातं…”
Lakhat Ek Aamcha Dada
Video : “…तसा सूर्या तुमचा जावई”, तुळजाने केली डॅडींकडे ‘ही’ मागणी; मालिकेत पुढे काय होणार? पाहा प्रोमो

आणखी वाचा – दोन मुलं, अफेअर, १३ वर्षांचा संसार मोडला अन्…; जावेद अख्तर यांच्या पहिल्या पत्नीचा उल्लेख करत शबाना म्हणाल्या, “प्रेम होतं म्हणून…”

आणखी वाचा – “लग्नापूर्वी माझे अफेअर्स होते पण…”, लग्नानंतर वनिता खरातचा खासगी आयुष्याबाबत खुलासा, म्हणाली, “याआधी मी…”

ईशा ‘नीता मुकेश अंबानी सांस्कृतिक केंद्र’च्या उद्घाटन सोहळ्या दरम्यान फोटोंसाठी विविध पोझ देताना दिसली. तिने लाल रंगाचा डिझायनर गाऊन परिधान केला होता. ईशाने यावेळी छायाचित्रकारांशी प्रेमळ संवाद साधला. ती म्हणाली, “तुम्ही इथे आल्याबाबत तुमचे आभार. तुमच्या उपस्थितीमुळे आम्हाला खूप आनंद झाला. कार्यक्रमामधून जाण्यापूर्वी सगळ्यांनी जेवून जा”.

आणखी वाचा – Video : धर्मेंद्र यांच्या फार्महाऊसवर जोरदार दारू पार्टी, स्वतःच व्हिडीओ शेअर करत म्हणाले, “माझे मित्र…”

ईशाने सगळ्यांना आपुलकीने व काळजीपूर्वक जेवून जाण्यास सांगितलं. ईशाच्या या स्वभावामुळे तिच्यावर नेटकरी कौतुकाचा वर्षाव करत आहेत. श्रीमंती असूनही अजून पाय जमिनीवरच आहेत, पैसा असूनही संस्कार कायम आहेत, याला म्हणतात संस्कार, तू किती चांगली आणि गोड आहेस, समोरच्या व्यक्तीचा आदर कसा करावा हे हिच्याकडून शिकावं, आज तू मन जिकलं अशा अनेक कमेंट नेटकऱ्यांनी केल्या आहेत.

Story img Loader