Shaktimaan Teaser Release : १९९० च्या दशकात टीव्हीवर दाखवली जाणारी ‘शक्तिमान’ ही मालिका आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहे. भारताचा पहिला सुपरहीरो ही ‘शक्तिमान’ची ओळख आहे. मार्व्हल आणि डीसीचे सुपरहीरो येण्याआधीच भारताचा स्वतःचा सुपरहीरो होता. या मालिकेत मुकेश खन्ना यांनी पहिला भारतीय सुपरहीरो ‘शक्तिमान’ साकारला होता. आजही प्रेक्षक त्यांना ‘शक्तिमान’ म्हणूनच ओळखतात. आठ वर्षे चाललेली ही मालिका बंद झाल्यानंतर या मालिकेवर सिनेमा येणार किंवा ही मालिका पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार अशा अनेक चर्चा होत होत्या. अनेक वर्षे ‘शक्तिमान’ प्रेक्षकांच्या भेटीला आला नव्हता. मात्र, ‘शक्तिमान’ परत येत असल्याचे संकेत मुकेश खन्ना यांनी दिले आहेत. रविवारी मुकेश खन्ना यांनी आपल्या सोशल मीडियावर पोस्ट शेअर करीत ‘शक्तिमान’ परत येणार असल्याचं सूचित केलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुकेश खन्ना यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक जुना फोटो आणि एक व्हिडीओ क्लिप शेअर केली आहे. त्या पोस्टला त्यांनी कॅप्शन देत लिहिलं, “आता त्याच्या परतीची वेळ आली आहे. आपला पहिला भारतीय सुपर टीचर-सुपरहीरो. आजच्या मुलांवर अंधार आणि वाईट शक्तींचं सावट वाढत चाललंय. त्यामुळे ‘शक्तिमान’ परत येतोय एक संदेश आणि उपदेश घेऊन, आजच्या पिढीसाठी. त्याचं स्वागत करा.”

हेही वाचा…Video : आई अन् लेकीचा ‘जमाल कुडू’ गाण्यावर डान्स, रिद्धिमा कपूर साहनीबरोबर नीतू कपूर यांनी धरला ठेका; पाहा व्हिडीओ

पुन्हा मुकेश खन्नाच साकारणार ‘शक्तिमान’

‘शक्तिमान’ची भूमिका रणवीर सिंग साकारणार, अशा चर्चा असताना ‘शक्तिमान’च्या ट्रेलरवरून पुन्हा एकदा मुकेश खन्नाच ‘शक्तिमान’ची भूमिका साकारणार हे स्पष्ट झालं आहे. टीजरमध्ये ‘शक्तिमान’ त्याच्या स्टाईलनं गोल गोल फिरत येतो. त्याच्या आजूबाजूला भगतसिंग, सुभाषचंद्र बोस या क्रांतिकारकांचे फोटो आहेत. ‘शक्तिमान ‘टीजरमध्ये ‘आझादी के दिवानों ने जंग लढी’ हे गाणं म्हणताना दिसत आहे. मात्र, ‘शक्तिमान’ मालिकेच्या स्वरूपात की सिनेमाच्या स्वरूपात येणार हे अजून गुलदस्त्यात आहे.

चाहत्यांच्या आठवणी जाग्या…

‘शक्तिमान’च्या परतीच्या बातमीने अनेकांच्या आठवणींना उजाळा मिळाला आहे. अनेक चाहत्यांनी सोशल मीडियावर त्यांच्या प्रतिक्रिया दिल्या. एकानं लिहिलं, “शक्तिमान बघण्यासाठी मी कित्येक वेळा शाळा बुडवली आहे,” दुसऱ्यानं लिहिलं, “तुम्ही माझ्या बालपणाचे सुपरहीरो आहात.” एका चाहत्यानं लिहिलं, “माझा शक्तिमान”, “तुम्ही माझे सुपरहीरो आहात”, “मला शक्तिमानला पुन्हा पाहण्याची खूप उत्सुकता आहे सर” अशा कमेंट्स चाहत्यांनी केल्या आहेत.

‘शक्तिमान’च्या परतीच्या बातमीने अनेकांच्या आठवणींना उजाळा मिळाला आहे. अनेक चाहत्यांनी मुकेश खन्ना यांच्या इन्स्टाग्राम पोस्टवर त्यांच्या प्रतिक्रिया दिल्या. (Photo Credit – Mukesh Khanna Instagram)

हेही वाचा…आंतरधर्मीय विवाहामुळे सैफ अली खानला मिळाल्या होत्या धमक्या; स्वतः खुलासा करत म्हणालेला, “आमच्या घराजवळ…”

आठ वर्ष चाललेल्या ‘शक्तिमान’चा प्रवास

१९९७ मध्ये दूरदर्शनवर सुरू झालेला ‘शक्तिमान’ हा शो आठ वर्षे चालला. या मालिकेचे ४५० एपिसोड्स प्रसारित झाले. या शोमध्ये मुकेश खन्ना यांच्याबरोबर किटू गिडवानी, वैष्णवी, सुरेंद्र पाल व टॉम ऑल्टर यांसारखे कलाकार होते. ‘शक्तिमान’ हा एक रहस्यमय आणि अलौकिक शक्ती असलेला सुपरहीरो होता.

हेही वाचा…कंगना रणौतच्या आजीचं झालं निधन; इन्स्टाग्रामवर स्टोरी शेअर करीत अभिनेत्री म्हणाली…

“रणवीरनं शक्तिमानच्या भूमिकेसाठी मनधरणी करण्याचा प्रयत्न केला”

‘बॉलीवूड ठिकाना’ला दिलेल्या मुलाखतीत मुकेश खन्ना यांनी सांगितलं, “सर्वांना माहीत आहे की, रणवीर सिंहने त्याला शक्तिमानची भूमिका साकारण्याची संधी मिळावी यासाठी त्यानं माझी मनधरणी करण्याचा प्रयत्न केला होता. हे खरं आहे की, मी रणवीरचं त्याच्या अभिनयासाठी कौतुक केलं आणि त्याला प्रतिभावान अभिनेता म्हटलं होतं. मात्र, मी रणवीरला शक्तिमान म्हणून मान्यता दिलेली नव्हती. मी याबाबत एक व्हिडीओसुद्धा अपलोड केला होता; ज्यामध्ये मी स्पष्ट केलं की, रणवीरला या भूमिकेसाठी मी निवडलेलं नाही.”

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mukesh khanna confirms shaktimaan return teaser release psg