शक्तिमान या लोकप्रिय शोमध्ये ९० च्या दशकातील मुलांचे सुपरहिरो मुकेश खन्ना सोशल मीडियावर नेहमीच काही नाही काही कारणाने चर्चेत असतात. अनेकदा त्यांच्या वक्तव्यांमुळे वादही होतात आणि त्यानंतर मुकेश खन्ना यांच्यावर जोरदार टीका होताना दिसते. आताही असंच काहीसं घडलं आहे. मुकेश खन्ना यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. ज्यात त्यांनी महिलांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. त्यांच्या या व्हिडीओवर नेटकरी भडकले आहेत.
मुकेश खन्ना यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये ते म्हणतात, “जर एखादी मुलगी एखाद्या मुलाला स्वतःहून शरीरसंबंधांसाठी विचारत असेल तर ती मुलगी असभ्य आहे. ती मुलगी, एक मुलगी नाही तर ती धंदा करणारी आहे. कारण अशा निर्लज्जपणाच्या गोष्टी सभ्य समाजातील कोणतीही मुलगी करणार नाही आणि जर ती करत असेल ती असभ्य आहे, असं करणं हा तिचा व्यवसाय आहे. यात तुम्ही सहभागी होऊ नका.”
आणखी वाचा- सलमान खानही मराठी चित्रपटाच्या प्रेमात! अंकुश चौधरीच्या ‘दगडी चाळ २’साठी लिहिली खास पोस्ट
सोशल मीडियावर मुकेश खन्ना यांचा हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर महिलांबाबत त्यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर नेटकरी प्रचंड संतापलेले दिसत आहे. मुकेश खन्ना यांच्यावर सोशल मीडियाच्या माध्यमातून जोरदार टीका केली जात आहे. त्यांच्या या व्हिडीओवर कमेंट करत अनेकांनी त्यांना चांगलंच सुनावलं आहे.
आणखी वाचा- ‘शक्तिमान’ आता मोठ्या पडद्यावर, सुपरहिरोच्या भूमिकेसाठी ‘या’ अभिनेत्याला ऑफर
मुकेश खन्ना यांच्या व्हिडीओवर कमेंट करताना एका युजरने लिहिलं, “किमान स्त्री शक्तीचा तरी मान ठेवायला हवा होता” तर दुसऱ्या एका युजरने लिहिलं, “जेव्हा शक्ती आणि मान दोन्ही गोष्टी माणसाला सोडून जातात तेव्हा तो असं बोलू लागतो.” तर आणखी एकाने मुकेश खन्ना यांच्यावर टीका करताना म्हटलंय, “माहीत नव्हतं की इच्छा आणि महिलांची संमती त्यांना सेक्स वर्कर ठरवतात.” तसेच एका युजरने तर मुकेश खन्ना यांच्यावर राग व्यक्त करत लिहिलं, “शक्तिमान म्हातारपणात काहीही बरळतोय, आता तो सनकीमान झाला आहे.” एकूणच मुकेश खन्ना यांच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांच्या संतप्त प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत.