बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राला पॉर्न चित्रपटांची निर्मिती आणि पॉर्न अॅपप्रकरणी अटक केल्यानंतर दिवसें दिवस वेग वेगळ्या गोष्टी समोर येताना दिसत आहेत. सतत राज विरोधात पुरावे समोर येत आहेत. दरम्यान, या प्रकरणात आता बॉलिवूड अभिनेते मुकेश खन्ना यांनी वक्तव्यं केलं आहे. शिल्पा शेट्टीला राज कुंद्राच्या प्रत्येक गोष्टी बद्दल नक्कीच माहित असणार आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
मुकेश खन्ना यांनी ‘एबीपी न्युज’ला नुकतीच मुलाखत दिली. या मुलाखतीत शिल्पाला राजच्या या सगळ्या प्रकारा बद्दल माहित असेल असे ते म्हणाले आहेत. “पोलीस या प्रकरणात चौकशी करत आहेत. त्यामुळे आपण उगाचच काहीतरी प्रतिक्रिया देणं योग्य ठरणार नाही. पण पॉर्न तयार करणं गुन्हा आहे. यामुळे आपली तरूण पिढी वाईट मार्गाला जात आहे. म्हणून गुन्हेगारांना कठोर शिक्षा झाली पाहिजे. यामुळे पॉर्नोग्राफी बंद होईल,” असे मुकेश खन्ना म्हणाले.
आणखी वाचा : पतीच्या अटकेनंतर शिल्पाची भावनिक पोस्ट, केली ‘ही’ विनंती
पुढे ते म्हणाले, “परंतु या प्रकरणात शिल्पा शेट्टीला जबाबदार ठरवणं योग्य नाही. कारण समोर आलेल्या माहितीनुसार राज कुंद्रा हे काम करतो. पण, तिला याबद्दल नक्कीच माहित असणार. तिचा पती दररोज कोट्यवधींच्या उलाढाली करतो. कोट्यवधी रुपये कमावतो अन् त्याला हे पैसे कसे मिळतात हे शिल्पा माहित नाही हे मान्य करणं थोडं कठीण आहे.”
आणखी वाचा : सुपर डान्सरमध्ये शिल्पाच्या ऐवजी परीक्षक म्हणून दिसणार रितेश-जेनेलिया!
काय आहे प्रकरण?
फेब्रुवारी महिन्यात मुंबई पोलिसांच्या एका पथकाने मढ येथील ग्रीन पार्क बंगल्यावर धाड टाकली होती. याठिकाणी पॉर्नोग्राफिक शुटिंग होत असल्याच्या माहितीनंतर ही कारवाई करण्यात आली होती. त्यावेळी पोलिसांनी पाच जणांना अटक केली होती. तर एका मुलीची सुटका केली होती. अटक करण्यात आलेल्या पाच जणांमध्ये दोन अभिनेत्यांचा, तर दोन तरुणींचा समावेश आहे. या दोन्ही तरुणी अभिनयाच्या क्षेत्रात नशिब आजमवण्यासाठी आल्या होत्या. मात्र, त्या पॉर्नोग्राफिक व्हिडीओ तयार करणाऱ्या प्रोडक्शन हाऊसच्या जाळ्यात अडकल्या. ही मोठी कारवाई केल्यानंतर या प्रकरणाचा तपास सुरू केला होता. या प्रकरणात राज कुंद्रा मुख्य सूत्रधार असल्याचं दिसल्यानंतर त्याला १९ जुलै रोजी चौकशीसाठी बोलावण्यात आलं होतं. सुमारे ७ ते ८ तास त्यांची चौकशी करण्यात आली. त्यानंतर सायंकाळी राज कुंद्राला पोलिसांकडून अटक करण्यात आली.