अभिनेता आणि कॉमेडियन वीर दास त्याच्या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. लोक वीर दासवर देशाचा अपमान केल्याचा आरोप करत आहेत. वीर दास सध्या अमेरिकेत आहे. अमेरिकेत त्याच्या वक्तव्यावरुन वाद निर्माण झाला आहे. त्याने माफी मागितली असली तरी देखील सोशल मीडियावर अनेकांनी त्याने भारताचा अपमान केल्याचे म्हटले आहे. यावर आता शक्तिमान फेम अभिनेता मुकेश खन्ना संतापले आहेत.
मुकेश खन्ना यांनी हा व्हिडीओ त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. जो कॉमेडियन स्वत:ला वीर दास बोलतो आणि स्वत:ला यशस्वी कॉमेडियन समजतो, त्याने स्टॅंडअप कॉमेडीच नाव खराब केलं आहे, असे मुकेश खन्ना म्हणाले. एवढचं काय तर त्यांनी कॉमेडिच्या स्टँडर्ड वर प्रश्न केला आहे. या वीर दासला काय सिद्ध करायचं आहे. त्याची इतकी हिंमत की संपूर्ण देशाविरोधात तो बोलत आहे. त्यात तो दुसऱ्या देशाच्या एका हॉलमध्ये आपल्या देशाचे नाव खराब आणि देशाबद्दल वाईट गोष्टी बोलतो?
आणखी वाचा : लाइव्ह कॉन्सर्टमध्ये गायिकेने केली चाहत्याच्या चेहऱ्यावर ‘लघुशंका’
हा व्हिडीओ शेअर करत मुकेश म्हणाले, “Washington DC च्या हॉलमध्ये जितक्या टाळ्या वाजल्या, चाबकाने तितकेच फटके आपल्या देशवासीयांच्या वतीने त्याला दिले पाहिजे. परदेशात आपल्या देशाचा अपमान करणाऱ्यांची हिंमत तोडली पाहिजे, जेणे करूण भविष्यात असं करायची हिंमत कोणी करणार नाही.”
आणखी वाचा : कंगना रणौतच्या ‘भीक’ या वक्तव्यावर जावेद अख्तर यांनी दिली प्रतिक्रिया
वीर दासच्या या संपूर्ण व्हिडिओतली एक छोटी क्लिप ट्विटरवर प्रचंड व्हायरल झाली आहे. ही क्लिप पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी त्याला ट्रोल केले आहे. मी अशा भारतातून आलो आहे, जिथे दिवसा महिलांची पूजा केली जाते आणि रात्री त्यांच्यावर बलात्कार होतो. मी अशा भारतातून आलो आहे जिथे हवा गुणवत्ता निर्देशांक ९००० आहे तरीही आम्ही आमच्या छतावर झोपतो आणि रात्री तारे पाहतो. मी अशा भारतातून आलो आहे जिथे आम्हाला शाकाहारी असण्याचा अभिमान वाटतो आणि तरीही आम्ही भाजीपाला पिकवणाऱ्या शेतकर्यांवर धावून जातो,” असे वीर त्या व्हायरल झालेल्या व्हिडीओत बोलत आहे.