अभिनेत्री मुक्ता बर्वे ही लोकप्रिय मराठी अभिनेत्रींपैकी एक आहे. मुक्ता लवकर तिच्या चाहत्यांना भेटायला येणार आहे. सत्य घटनांवर आधारित ‘वाय’ या चित्रपटात मुक्ता मुख्य भूमिका साकारणार आहे. नुकताच या चित्रपटाचं पोस्टर प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट येत्या २४ जून रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुक्ताने वाय या चित्रपटाचं पोस्टर तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केलं आहे. पोस्टरमध्ये मुक्ताच्या संघर्षपूर्ण डोळ्यांत खंबीरपणे लढण्याची ताकद दिसत असून आजुबाजूला आगीचे लोळ दिसत आहेत. तर लाल रंगाच्या ‘वाय’ मध्ये ग्लोव्हस घातलेले हात वैद्यकीय हत्यार हाताळताना दिसत आहे. पोस्टरवरून हा चित्रपट महत्वपूर्ण विषयावर भाष्य करणारा दिसतोय.

आणखी वाचा : IPL ची मॅच राहिली बाजूला, भर मैदानात डेव्हिड वॉर्नरने केला ‘श्रीवल्ली’ डान्स

आणखी वाचा : महाराष्ट्राच्या राजकारणाचे केंद्रस्थान असलेला शरद पवार यांचा ‘सिल्व्हर ओक’ बंगला आतून कसा दिसतो, पाहा फोटो

चित्रपटाच्या ‘वाय’ या शिर्षकाच्या पार्श्वभागी असणाऱ्या WHY या इंग्रजी अक्षरामुळे ही चित्रपटाचा आशय आणि विषयाबद्दल उत्सुकता निर्माण झालेली आहे. ‘वाय’ एक दमदार कथा आणि आशय घेऊन प्रेक्षकांसमोर येणार असल्याचे दिसतेय. चित्रपटाबद्दल दिग्दर्शक अजित सूर्यकांत वाडीकर म्हणतात, ”सत्य परिस्थिती दाखवणारी, आजच्या काळात घडणारी ही कथा आहे. या भूमिकेसाठी मुक्ता शिवाय दुसऱ्या कोणत्याही अभिनेत्रीचा विचार माझ्या मनात नव्हता. मला खात्री आहे, या चित्रपटाला तुम्ही भरपूर प्रतिसाद द्याल.’’

आणखी वाचा : “मुस्लिमांनी प्रत्येक निवडणुकीत शिवसेनेला मतं द्यायला हवीत, ओवेसी आणि आझमी…”; केआरकेचं ट्वीट चर्चेत

वाय या चित्रपटाची निर्मिती कन्ट्रोल-एन प्रॉडक्शनने केली आहे. अजित सूर्यकांत वाडीकर यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. लवकरच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.