नात्यांच्या सुरक्षित चौकटीत, हसत खेळत आनंदी जीवन जगणाऱ्या व स्वतःच कुटुंब हेच विश्व मानणाऱ्या सर्वसाधारण स्त्रीच्या आयुष्यात, जेव्हा एखादं अनपेक्षित वादळ येते; तेव्हा तिचं संपूर्ण आयुष्यच उध्वस्त होते. आणि मग हीच सर्वसाधारण स्त्री, तिच्या भोवतालची सुरक्षित चौकट मोडून अन्यायाचा मागोवा घेते. एक अनपेक्षित अनुभव देणाऱ्या ‘ती’ च्या प्रतिशोधाचा थरार म्हणजेच झी युवावर येणारी नवीन मालिका ‘रुद्रम’. या मालिकेद्वारे छोट्या पडद्यावर एक अप्रतिम थरार प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

प्रत्येक भागाबरोबर एक वेगळीच उत्कंठा वाढवत ‘रुद्रम’ या मालिकेचा प्रवास सुरु होतो. सगळ्यात वेगाने घडणारी आणि तरीही केवळ ठराविक भागांमध्ये संपणारी ही गोष्ट अतिशय लक्षणीय आणि उल्लेखनीय आहे. व्यावसायिकदृष्ट्या इतकं बांधीव आणि अजिबात बेतलेलं वाटू नये असं लेखन, दिग्दर्शन आणि अभिनयात उजवी असलेली मालिका, रसिक प्रेक्षकांच्या वाट्याला क्वचितच येते. या मालिकेचा विषय गुतागुंतीचा असूनही तो अतिशय सोप्या रूपात मांडला आहे आणि या मालिकेची सर्वात जमेची बाजू म्हणजे मुक्ता बर्वे. छोट्या पडद्यावर कमी वेळा दिसलेल्या पण दीर्घ छाप पाडून गेलेल्या या नायिकेने या मालिकेतील व्यक्तिरेखा प्रभावीपणे रंगवली आहे . मुक्ताची ही व्यक्तिरेखा तमाम रसिकांना नक्कीच आवडेल.

वाचा : मृत्यूची चाहूल लागलेल्या इंदर कुमारने शेवटच्या मेसेजमध्ये लिहिलेले की..

झी युवावर ७ ऑगस्ट पासून सोमवार ते शुक्रवार रोज रात्री ९:३० वाजता रुद्रम या थरार मालिकेतून मराठी चित्रपट आणि नाट्यसृष्टीतील गुणी अभिनेत्री मुक्ता बर्वेचे मोठ्या काळानंतर छोट्या पडद्यावर पुनरागमन होणार आहे. ‘रुद्रम’ या मालिकेत तिच्यासोबत वंदना गुप्ते , सतीश राजवाडे , मोहन आगाशे , संदीप पाठक , किरण करमरकर , मिताली जगताप , सुहास पळशीकर विवेक लागू , सुहास सिरसाट , सई रानडे , अनिरुद्ध जोशी , मिलिंद फाटक , सुनील अभ्यंकर , आनंद अलकुंटे , किरण खोजे , आशिष कुलकर्णी या आणि अशा उत्तमत्तोम नामांकित कलाकारांची मांदियाळी असणार आहे . त्यामुळेच रसिकांसाठी ही मालिका एक मेजवानी ठरणार आहे.

वाचा : स्वप्नील जोशीच्या गाण्याचं बॉलिवूडकरांना याड लागलं! व्हिडिओ व्हायरल

गिरीश जोशीसारख्या लेखकाच्या लेखणीतून आकाराला आलेल्या आणि भीमराव मुडेसारख्या दिग्दर्शकाच्या दिग्दर्शनाखाली तयार होणाऱ्या आणि अभिनय संपन्न कलाकारांच्या अभिनयाने सजलेली ‘रुद्रम’ मालिका ही वेगळी ठरेल अशी अपेक्षा आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mukta barve vandana guptes new serial rudram on zee yuva