अभिनेत्री मुक्ता बर्वे, सई ताम्हणकर आणि मनवा नाईक या तिघींचा धमाल ग्लॅमरस अवतार लवकरच प्रेक्षकांना पाहावयास मिळणार आहे. गजेंद्र अहिरे दिग्दर्शित पॉपकॉर्न चित्रपटात या तिघीजणी ग्लॅमरस रुपात त्यांची जादू चालविणार आहेत. सई ताम्हणकर ब-याच चित्रपटांमध्ये बोल्ड अवतारात दिसली आहे. मात्र, मुक्ता बर्वे पहिल्यांदाच अशा ग्लॅमरस अवतारात प्रेक्षकांसमोर येणार आहे. त्यामुळे तिचा हा नवा अवतार नक्कीच चित्रपटाचे विशेष आकर्षण ठरेल.
मुक्ता-सई-मनवा या तिघींव्यतीरिक्त चित्रपटात स्मिता तांबे आणि आदिती भागवत यांच्याही भूमिका आहेत. पण, चित्रपटातील ‘सरप्राइज पॅकेज’ म्हणजे या पाच अभिनेत्रींसाठी केवळ एकच हिरो देण्यात आला आहे. सिद्धार्थ जाधव यात विशेष भूमिका करणार आहे. त्यामुळे चित्रपटाला अजूनच रंगत येणार आहे.
पॉपकॉर्नचे चित्रीकरण गोवा आणि तेथील समुद्र किना-यावर झाले असून हा चित्रपट यावर्षी १४ जुलैला प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा