स्टार प्रवाहवरील ‘मुलगी झाली हो’ ही मालिका घराघरात लोकप्रिय आहे. या मालिकेतील कथा आणि त्यातील कलाकार यामुळे त्याची एक वेगळीच ओळख निर्माण झाली आहे. या मालिकेतील साजिरीच्या वडिलांची म्हणजेच विलास पाटील भूमिका साकारणारे अभिनेते किरण माने हे नेहमीच काही ना काही कारणामुळे चर्चेत असतात. नुकतंच त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यांची ही पोस्ट तुफान व्हायरल होत आहे.

किरण माने यांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ उद्योपती रतन टाटा यांच्या वाढदिवसाचा आहे. यशस्वी उद्योजक, दूरदृष्टी व्यक्ती, देशभक्त आणि सामान्यांप्रती आदर असणारी व्यक्ती म्हणून रतन टाटा यांची ओळख आहे. २८ डिसेंबर रोजी त्यांनी आपला वाढदिवस अत्यंत साधेपणाने साजरा केला. त्यांनी छोटा केकवर लावलेल्या मेणबत्तीला फुंकर मारून वाढदिवस साजरा केला. या वाढदिवसाचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ शेअर करत त्यांनी एक भलीमोठी पोस्ट लिहिली आहे.

Aishwarya Narkar
Video: “शेवटचे एकदा…”, ऐश्वर्या नारकर यांनी कोणासाठी शेअर केली पोस्ट?
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Shocking video of elder man kissing young woman on stage while dancing obscene video viral on social media
तरुणीला पाहून आजोबांचा सुटला ताबा, भरस्टेजवर डान्स सुरू असतानाच केलं किस अन्…, VIDEOमध्ये पाहा पुढे काय काय घडलं
Viral Video Of Little Girl
‘साजन जी घर आये’ गाणं वाजताच टेरेसवर ‘तिनं’ धरला ठेका; चिमुकलीचा व्हायरल VIRAL VIDEO एकदा बघाच
A groom breaks down in tears as he watches his bride cry
नवरीला रडताना पाहून नवरदेवही रडला! VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, “नशीबवान आहेस ताई तू…”
Chhoti Tara Tadoba , Tadoba Chhoti Tara Tiger Calf Video, Chhoti Tara Tiger,
VIDEO : ‘तिने’ सहावेळा मातृत्त्वाचा अनुभव घेतला, पण आता…
Fire at birthday party girl shocking video viral on social media
केकवर मेणबत्ती लावली अन् होत्याचं नव्हतं झालं; वाढदिवस साजरा करताना तुम्हीही ‘ही’ चूक करता का? मग हा VIDEO नक्की पाहा
Success story of ias deshal dan ratnu son of tea seller who cleared upsc with 82 rank
शहीद झालेल्या भावामुळे मिळाली प्रेरणा, चहा विक्रेत्याचा मुलगा झाला IAS, वाचा कसा पार केला टप्पा

किरण माने यांची इन्स्टाग्राम पोस्ट

“खरंय..खरंय.. या महान माणसाच्या या कृतीनं खरंच लै जनांच्या सनसनीत कानफाडीत मारलेली हाय या ठिकानी…!”

“…परवाच माझ्या एका मित्रानं त्याच्या शुटिंग सेटवरच्या प्रोडक्शन कंट्रोलरचा वाढदिवस साजरा करतानाचा व्हिडीओ शेअर केला होता.. “किरण, आम्ही कस्लं एंजॉय केलं बघ.” म्हन्ला.. चाळीस-बेचाळीस केक आणून त्यात बचाबचा हात बुडवून एकमेकांच्या तोंडावर थापन्याची अक्षरश: रंगपंचमी चालली होती ! सगळ्या परिसरात पडणारा केकचा सडा…मूठमूठभर क्रीम हात घेऊन एकमेकांमागे चाललेली पळापळी.. केकची फेकाफेकी बघून संताप येत होता.. बरं, ज्याचा वाढदिवस साजरा होत होता, त्याचं कर्तृत्व, त्याची लायकी, त्याचं ‘कॅरॅक्टर’, त्याची नैतीकता अशी आहे की त्याची वाढदिवसादिवशी खेटरानं पूजा केली तरी कमी हाय !!! त्याचवेळी एका गल्लीतल्या एका सडकछाप गावगुंडानं तलवारीनं केक कापल्याचा एक फोटो बघूनबी संताप येत होता.. असो.”

“..आपण या व्हिडीओबद्दल बोलूया. यात दिसनारा ह्यो माणूस साधासुधा नाय… ह्यानं चाळीस कोटी केक कापले तरी कमीच हाय यवढं याचं काम हाय… ‘टाटा उद्योगसमूहाला’ नवी दिशा देणार्‍या या माणसाचा ‘साधेपणा’ भल्याभल्यांना थक्क करनारा हाय भावांनो.. लहानपणीपासनच यानं ‘आपन जमशेदजी टाटा यांचे नातू आहोत’ असा आव आनला नाय… ‘टाटा’ हे आपलं फक्त आडनांव हाय, आपण आपल्या सोत्ताच्या बळावर उभं राहायचं या विचारानं झपाटलेला ह्यो गडी ! आर्किटेक्ट होन्यासाठी जवा अमेरीकेला गेला तवा तिथं शिक्षण आणि उमेदवारीच्या दहा वर्षांत या अवलीयानं हाटेलात भांडी घासन्यापास्नं, कारकुनाच्या नोकरीपर्यंत जे जमंल ते केलं !!” असे ते म्हणाले.

“परत आल्यावर ‘टाटा समूहा’त दाखल व्हायच्या आधी जमशेदपूरच्या ‘टाटा स्टील’मध्ये या पठ्ठ्यानं कोळशाची पोती पाठीवरनं वहान्यापास्नं ते धगधगत्या भट्टीपाशी काम करण्यापर्यंतचे सर्व अनुभव घेतल्यानंतरच कंपनीची धुरा हातात घेतली… त्यानंतर त्यानं काय केलं ते मी हितं सांगायची गरजच नाय… नेल्को वर आनन्यापास्नं ते जग्वार आन् लॅंडरोव्हर इकत घेन्यापर्यन्तचा इतिहास भूगोल जगाला म्हायतीय… बापजाद्यांची एकेक प्राॅपर्टी इकून थयाथया नाचनार्‍या भुरट्यांची सद्दी असताना, आधीपासन असलेल्यात भर घालून नव्या भरीव गोष्टी इकत घेनारा ह्यो मानूस मोलाचा ठरतो, तो यासाठीच !”

“…तर सांगायचा मुद्दा ह्यो की, कालच या मानसानं वयाचा ८४ वा बर्थ डे असा साजरा केला ! हे पाहून, या ठिकानी आपन सगळ्यांनी सोत्ताला एक मुस्काडात नाय मारून घेतली तरी हरकत नाय.. पन यातनं कायतरी शिकूया, हीच अपेक्षा ! कडकडीत सलाम रतन टाटा. लब्यू,” अशी पोस्ट त्यांनी लिहिली आहे.

Story img Loader