स्टार प्रवाहवरील ‘मुलगी झाली हो’ ही मालिका घराघरात लोकप्रिय आहे. या मालिकेतील कथा आणि त्यातील कलाकार यामुळे त्याची एक वेगळीच ओळख निर्माण झाली आहे. मात्र आता लवकरच ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. या मालिकेच्या टीआरपीमध्ये झालेली घसरण याचे प्रमुख कारण असल्याचे बोललं जात आहे. मात्र नुकतंच या सर्व चर्चांवर स्टार प्रवाहने स्पष्टीकरण दिले आहे.
स्टार प्रवाहवरील ‘मुलगी झाली हो’ ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याचे बोललं जात आहे. लवकरच या मालिकेचा शेवटचा भाग प्रदर्शित केला जाईल, असे सांगितले जात होतं. गेल्या काही आठवड्यांपासून मुलगी झाली हो मालिकेतील टीआरपी घसरत चालला आहे. त्यामुळे अनेक चर्चा सुरु होत्या. नुकतंच यावर स्टार प्रवाहने स्पष्टीकरण दिले आहे.
‘मुलगी झाली हो’ मालिका लवकरच घेणार प्रेक्षकांचा निरोप, कारण आले समोर
‘मुलगी झाली हो’ मालिकेच्या जागी आता रात्री ९ वाजता ‘तुझेच मी गीत गात आहे’ ही नवी मालिका प्रसारित होणार आहे. याचा अर्थ मालिका बंद होणार असं नाही. मुलगी झाली हो ही मालिका नवीन वेळेत दाखवली जाणार आहे. या मालिकेच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. ही मालिका बंद होणार नाही. त्याऐवजी दुपारी २ वाजता ही मालिका प्रसारित केली जाईल, असे स्टार प्रवाहने सांगितले आहे. त्यामुळे ही मालिका बंद होणार असल्याच्या अफवांवर पडदा पडला आहे.
स्टार प्रवाहवर मुलगी झाली हो या मालिकेऐवजी प्रसारित होणारी ‘तुझेच मी गीत गात आहे’ या मालिकेचा प्रोमो समार आला आहे. या मालिकची कथा एक लहान मुलगी आणि तिचे गाणे यावर आधारित आहे. स्टार प्लसवरील ‘कुल्फी कुमार बाजेवाला’ या हिंदी मालिकेचा ही मालिका मराठी रिमेक असणार आहे. या मालिकेत नेमके कोणकोणते कलाकार असणार? याबद्दल अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.