महाराष्ट्राच्या राजकारणानं गेल्या काही दिवसांत मोठे भूकंप पाहिले, शेवटपर्यंत कुणालाच माहिती नव्हतं की काय होईल, एखाद्या सस्पेन्स चित्रपटांपेक्षाही जबरदस्त असा क्लायमॅक्स सगळ्यांनी पाहिला. राजकीय घडामोडींच्या या पार्श्वभूमीवर वेबविश्वातही एक मोठी घडामोड घडणार आहे. लवकरच प्लॅनेट मराठी ओटीटीवर सत्तानाट्यावर आधारित ‘मी पुन्हा येईन’ नावाची वेबसीरिज येणार आहे.

आणखी वाचा : व्हिडीओ मलायकाचा, पण मागच्या काकांनी वेधले नेटकऱ्यांचे लक्ष; पाहा व्हिडीओ

Theatre canteen owner bites man's ear over food bill during 'Pushpa 2' screening.
Pushpa 2 : चित्रपटगृहाच्या कॅन्टीन मालकाने घेतला पुष्पा २ पाहायला आलेल्या प्रेक्षकाच्या कानाचा चावा, मध्यांतरावेळी नेमकं काय घडलं?
Viral Trend Chastity Belts:
Chastity Belt: योनी शुचिता पट्ट्याचा इतिहास आणि त्यामागील…
tharala tar mag kalpana thrown out sayali from house arjun emotional breakdown
ठरलं तर मग : कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं भांडं फुटलं! सासुबाईंनी सायलीला घराबाहेर काढलं, अर्जुनला अश्रू अनावर…; पाहा प्रोमो
Sai Pallavi reacts on turning vegetarian for Sita role in Ramayana
‘रामायण’ सिनेमासाठी मांसाहार सोडल्याचे वृत्त पाहून भडकली साई पल्लवी; कायदेशीर कारवाईचा इशारा देत म्हणाली…
Nitin Gadkari on Omraje Nimbalkar
Maharashtra News Highlights : “ताजमहल लवकर बांधून झाला पण..”, ठाकरेंच्या खासदाराचा संसदेत मराठीत प्रश्न, नितीन गडकरींनी दिले ‘असे’ उत्तर
Muramba
Video: शिवानी मुंढेकरचा मॉर्डन लूक व ‘या’ अभिनेत्याची होणार एन्ट्री; पाहा ‘मुरांबा’ मालिकेचा नवीन प्रोमो
Devendra Fadnavis Nagpur visit cancelled
प्रथम १२, नंतर १३ आणि आता १५, फडणवीसांच्या नागपूर दौऱ्याचा मुहूर्त का लांबला ?
upendra limaye first telugu film director praises him
उपेंद्र लिमयेंचा पहिला तेलुगू चित्रपट! थेट दाक्षिणात्य दिग्दर्शकाकडून कौतुक; म्हणाला, “सर कोणतीही भूमिका…”

टीझरमध्ये दोन पक्षाचे नेते सत्तेसाठी आमदारांची कशी पळवापळवी, फोडाफोडी करत आहेत हे पाहायला मिळत आहे. एवढंच नाही तर शासकीय यंत्रणांचाही कसा बेमालूमपणे वापर केला जातो आणि अधिकारीवर्गही यात आपली पोळी कशी भाजून घेतात, हे या टीझरमधून कळतेय. राजकारणावर आधारित या वेबसीरिजमध्ये सत्तालोलूपता, कपट-कारस्थान, संधीसाधूपणा, आमदारांची मेगाभरती, फोडाफोडी, पळवापळवी आणि सध्या चर्चेत असलेलं ‘रिसॉर्ट पॉलिटिक्स’ असा सगळा मसाला पाहायला मिळणार आहे.

आणखी वाचा : “झाडाला मिठी मारण्यापेक्षा…”, पुन्हा एकदा सुमीत राघवनचे ट्वीट चर्चेत

‘मी पुन्हा येईन’ या वेबसीरिजबद्दल प्लॅनेट मराठीचे प्रमुख, संस्थापक अक्षय बर्दापूरकर म्हणतात, “सध्याच्या राजकीय घडामोडींचा आणि या सीरीजचा तसा अर्थाअर्थी काहीही संबंध नाही, पण, चित्रपटात किंवा वेबसीरीजमध्ये तेच पाहायला मिळतं जे आपल्या आजुबाजूला घडतं. त्यामुळे अगदीच असत्य घटनांवर आधारित ही वेबसीरीज असली तरी, राजकीय कुलंगड्या, शह-काटशह हे पाहण्यात प्रेक्षकांना रस असतो हे स्पष्ट आहे. प्रेक्षकांच्या मनोरंजनाची हीच गरज ‘मी पुन्हा येईन’ ही वेबसीरीज पूर्ण करेल”

आणखी वाचा : अर्जुन कपूरची बहिण अंशुलाने कॅमेऱ्यासमोर काढून दाखवली ब्रा; प्रियांका चोप्रा, म्हणाली…

पाहा टीझर

आणखी वाचा : आई-बाबांचं भांडण आणि विठ्ठलाचं पहिल्यांदा घेतलेलं दर्शन; कुशल बद्रिकेने शेअर केला खास व्हिडीओ

अरविंद जगताप यांचे लिखाण आणि दिग्दर्शन असलेल्या या वेबसीरिजची निर्मिती प्लॅनेट मराठी, गौतम कोळी आणि जेम क्रिएशन्सने केली आहे. या वेबसीरिजमध्ये सयाजी शिंदे, उपेंद्र लिमये, भारत गणेशपुरे, सिद्धार्थ जाधव, प्रभाकर मोरे, अमित तडवळकर, रमेश वाणी, संजय कुलकर्णी, राजेश दुर्गे, राजेंद्र गुप्ता, रुचिता जाधव, सीमा कुलकर्णी आणि दिप्ती क्षीरसागर यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

Story img Loader