निर्माता-दिग्दर्शक प्रकाश झांचा ‘सत्याग्रह’ चित्रपट ३० ऑगस्टरोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात अमिताभ बच्चन, अजय देवगन आणि करीना कपूर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. यूटीवी मोशन पिक्चर्स आणि झा यांनी प्रसिध्द केलेल्या एका निवेदनात चित्रपट प्रदर्शनाची तारीख घोषीत केली गेली. चित्रपटात अर्जुन रामपाल, मनोज वाजपेयी आणि अमृता राव यांच्या सुध्दा प्रमुख भूमिका आहेत.
झा म्हणाले, ऑगस्टमध्ये तीन मोठे चित्रपट एका मागोमाग एक प्रदर्शित होत आहेत. सत्याग्रहसाठी आम्हाला दोन अठवड्याचा अवधी मिळत असून तिन्ही प्रतिक्षीत चित्रपटांना प्रेक्षक मीळण्यास योग्य ती संधी मिळणार आहे. ऑगस्ट महिन्यात प्रदर्शित होणा-या अन्य दोन चित्रपटांमध्ये शाहरूख आणि दीपिकाचा अभिनय असलेला ८ ऑगस्ट रोजी  प्रदर्शित होणारा ‘चैन्नई एक्सप्रेस’ आणि १५ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणारा मिलन लुथ्राचा ‘वन्स अपॉन ए टाइम इन मुंबई दोबारा’ यांचा समावेश आहे.

Story img Loader