बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन यांना सुरक्षा पुरवणारे मुंबई पोलीस हवालदार जितेंद्र शिंदे यांना आता निलंबित करण्यात आले आहे. जितेंद्र हे २०१५ पासून ऑगस्ट २०२१ पर्यंत अमिताभ यांचे बॉडीगार्ड म्हणून काम करत होते. जितेंद्र शिंदे यांना सेवा नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी निलंबित करण्यात आले आहे. जितेंद्र शिंदे यांच्या निलंबनाचे आदेश मंगळवारी जारी करण्यात आले असून त्यांची विभागीय चौकशी सुरू करण्यात आली आहे.
जितेंद्र यापूर्वी मुंबई पोलिसांच्या संरक्षण आणि सुरक्षा शाखेत तैनात होते. त्याने २०१५ पासून ऑगस्ट २०२१ पर्यंत अमिताभ बच्चन यांचे अंगरक्षक म्हणून काम केले होते. जेव्हा त्यांची वार्षिक कमाई १.५ कोटी रुपये इतकी असल्याचे समोर आल्यानंतर मुंबईचे पोलिस आयुक्त हेमंत नागराळे यांनी त्यांना काढून टाकले होते. ऑगस्ट २०२१ नंतर शिंदे यांची मुंबईतील डीबी मार पोलिस ठाण्यात नियुक्ती झाली.
आणखी वाचा : “गळ्यात कच्चा बादाम अडकलाय का?” रानू मंडल यांचं गाणं ऐकून नेटकऱ्यांनी लावला कपाळाला हात
आणखी वाचा : ‘माझी तुझी रेशीमगाठ’मध्ये जेसिकाची भूमिका साकारणारी अभिनेत्री आहे तरी कोण?
जितेंद्रच्या निलंबनाचे नेमके कारण विचारले असता, मुंबई पोलिसांच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, हवालदाराने त्याच्या वरिष्ठांना न कळवता किमान चार वेळा दुबई आणि सिंगापूरला प्रवास केला होता. ही सेवा नियमांचे उल्लंघन आहे. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, सेवा नियमानुसार त्यांनी परदेशात जाण्यासाठी वरिष्ठांची परवानगी घ्यायला हवी होती.
आणखी वाचा : “लतादीदी गेल्यानंतर तुम्ही जसे रडलात तसे माझ्या…”, मुमताज यांनी चाहत्यांना केली विनंती
यासोबतच जितेंद्र यांनी त्याच्या पत्नीच्या नावाने एक सुरक्षा एजन्सी देखील उघडली होती. तिच एजन्सी बच्चन कुटुंबाला सुरक्षा पुरवत होती. परंतु त्यातुन येणार सगळे पैसे हे त्यांच्या पत्नीच्या बॅंक खात्यात दिसून येत होते. यासोबत त्यांनी बऱ्याच प्रॉपर्टी खरेदी केल्या होत्या, असे अधिकाऱ्याने सांगितले. जितेंद्र यांना निलंबित केल्यानंतर मुंबई पोलिस आयुक्तांनी अतिरिक्त पोलिस आयुक्त दक्षिणदिलीप सावंत यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती स्थापन केली आहे.