मुंबई क्रुझ ड्रग्ज प्रकरणी २ ऑक्टोबर रोजी बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला अटक करण्यात आली होती. या प्रकरणी आज मुंबई उच्च न्यायालयाने आर्यन खानसह अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा या तिघांना जामीन दिला आहे. यापूर्वी मुलाला जामीन मिळावा म्हणून आई गौरी खानने नवस केला होता. आता तिचा नवस पूर्ण झाला असे म्हटले जात आहे. तसेच शाहरुख त्याचा वाढदिवस मुलासोबत साजरा करणार की नाही? असा प्रश्न अनेकांना पडला होता. आज अखेर आर्यनला जामीन मंजूर झाल्यानंतर शाहरुख त्याचा वाढदिवस मुलासोबत साजरा करणार असल्याचे म्हटले जात आहे.

२ नोव्हेंबर रोजी शाहरुख खान त्याचा वाढदिवस साजरा करतो. पण यंदा शाहरुख वाढदिवस मुलासोबत साजरा करणार की नाही असा प्रश्न सर्वांना पडला होता. कारण आर्यन खानच्या जामीनावर सुनावणीसाठी मुंबई उच्च न्यायालयाकडून तारीख पे तारीख दिली जात होती. आज अखेर त्याचा जामीन मंजूर करण्यात आला आहे. तसेच काही दिवसांपूर्वी गौरी खानने आर्यनच्या सुटकेसाठी नवसही केला आहे. जोपर्यंत आर्यनची सुटका होत नाही, तोपर्यंत घरात कोणताही गोड पदार्थ करायचा नाही, असे आदेश तिने घरातील कूकला दिले होते.
आणखी वाचा : “जेव्हा समीर घरी येतात तेव्हा दोन्ही मुली…”, क्रांती रेडकर झाली भावूक

आर्यन खानची बाजू मांडण्यासाठी भारताचे माजी अॅटर्नी जनरल आणि ज्येष्ठ वकील मुकुल रोहतगी यांच्यासह ज्येष्ठ वकील सतीश मानेशिंदे न्यायालयात हजर होते. तिन्ही आरोपींच्या वकिलांनी जामिनासाठी न्यायालयासमोर युक्तिवाद केल्यानंतर आज एनसीबीच्यावतीने अतिरिक्त सॉलिसीटर जनरल (ASG) अनिल सिंग यांनी बाजू मांडली. त्यावर रोहतगी यांनी पुन्हा युक्तिवाद केला. यानंतर न्यायालयाने निर्णय सुनावला.

जामीन मिळूनही आर्यनला आजची रात्र तुरुंगात काढावी लागणार

न्यायालयाने तिन्ही आरोपींना जामीन दिला असला तरी ते आजच तुरुंगाबाहेर येऊ शकणार नाहीत. न्यायालयाने जामीन मंजूर केला असला तरी त्याचं निकालपत्र आणि जामिनाच्या अटी यावर शुक्रवारी (२९ ऑक्टोबर) अंतिम निर्णय होईल. यानंतरच तिघे तुरुंगाबाहेर येऊ शकतील.

Story img Loader