मुंबई : नग्न छायाचित्रामुळे अभिनेता रणवीर सिंह अडचणीत आला आह़े  चेंबूर पोलिसांनी मंगळवारी त्याच्याविरोधात गुन्हा नोंदवला़   काही दिवसांपूर्वी अभिनेता रणवीर सिंहने एका मासिकासाठी नग्न छायाचित्र दिले होते. त्याचे हे छायाचित्र सध्या प्रसारमाध्यमांवर सर्वत्र पसरले आहे. त्यावरून अनेकांनी रणवीरला लक्ष्य केल़े

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

चेंबूर परिसरातील एका सामाजिक संस्थेचे ललित टेकचंदानी यांनी या प्रकरणी चेंबूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी मंगळवारी सकाळी रणवीर सिंहविरोधात भादंवि कलम २९२, २९३, ५०९ अंतर्गत गुन्हा नोंदवला़  भारताला चांगली संस्कृती लाभली असून, या छायाचित्रामुळे महिलांसह सर्वाच्या भावना दुखावल्याचा आरोप तक्रारदाराने केला आह़े 

याआधी समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांनी रणवीरच्या या  छायाचित्रावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होत़े  ‘‘जर लोकांसमोर नग्न होणे हे कलास्वातंत्र्य असेल तर मग मुस्लीम महिलांच्या हिजाबला  विरोध का’’, असा सवाल त्यांनी केला होता़